Month: January 2023

महानगर

कष्टाळूपणाची वृत्ती जोपासल्यास महाराष्टातील तरुण-तरुणींना अमेरिकेची दारे नेहमीच उघडी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिका हा देश हुशार व कुशल व्यक्तींना संधी देणारा देश आहे. जागतीकरणाच्या लाटेत पूर्वीपेक्षा आता अमेरिकेत नोकरीच्या खूप संधी निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील युवकांना अमेरिका व कॅनडा या देशात नोकरीच्या खूप संधी असून योग्य ते नियोजन व कष्टाळूपणाची वृत्ती जोपासल्यास महाराष्टातील तरुण व तरुणींना अमेरिकेची दारे नेहमीच उघडी आहेत. त्याचा […]Read More

देश विदेश

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या कार्यकाळात वाढ

नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप अध्यक्ष जे पी नड्डांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नड्डा यांना मुदतवाढ दिली गेल्याची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. भाजपच्या कार्यकारिणीत हा प्रस्ताव […]Read More

करिअर

TNPSC भर्ती 2023

तामिळना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तामिळनाडू लोकसेवा आयोग (TNPSC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 761 रोड इन्स्पेक्टर पदांसाठी (TNPSC भर्ती 2023) अधिसूचना जारी केली आहे. या पदांची भरती (TNPSC Recruitment 2023) राज्यातील तामिळनाडू पंचायत विकास अभियांत्रिकी अधीनस्थ सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागांतर्गत केली जाईल. उमेदवार TNPSC च्या अधिकृत वेबसाइट tnpsc.gov.in वर […]Read More

Featured

मोदी सरकार आर्थिक विषमता रोखण्यात सपशेल फेल !

  मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षात सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांची मोठी किंमत देशातील गरिब जनतेला मोजावी लागत असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचे ‘ऑक्सफॅम’ संस्थेच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. देशातील ४० टक्के संपत्ती केवळ १ टक्के […]Read More

देश विदेश

धनुष्यबाण कोणाला , फैसला २० तारखेला

नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्तासंघर्षावर आणि शिवसेना पक्ष, चिन्हावरील कायदेशीर लढाई एकाचवेळी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण वारंवार लांबणीवर जात असताना आयोगातली कार्यवाही मात्र पद्धतशीर सुरु आहे. मात्र आजही निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अंतिम निर्णय झाला नाही.  आता ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. […]Read More

अर्थ

दावोस मधील सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक, रोजगार

दावोस, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधीनी गर्दी केली आहे. दावोसच्या येथे […]Read More

महानगर

नाशिकबाबत महा विकास आघाडीचा उद्या अंतिम निर्णय

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होईल अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.Opposition Leader Ajit Pawar […]Read More

महाराष्ट्र

आमदार नितीन देशमुख यांची तीन तास ACB चौकशी…

अमरावती, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे बाळापूर मतदारसंघातील आमदार नितीन देशमुख हे आज अमरावती येथील ACB कार्यालयात दुपारी हजर झाले होते.त्यांची ACB च्या अधिकार्‍यांनी तीन तास चौकशी केली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असे चौकशी झाल्यावर आमदार नितीन देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. दरम्यान एसीबी कार्यालया बाहेर ठाकरे […]Read More

Breaking News

24 जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक तसेच व्यावसायिक कामगारांची 26 वी आणि महिलांची 21 वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात […]Read More

Breaking News

डाव्होस मध्ये पहिल्याच दिवशी ४५९०० कोटींची गुंतवणूक

डाव्होस, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वित्झर्लंड येथील डाव्होस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.45900 crore investment on the first day in Davos सामंत म्हणाले की, आज डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय […]Read More