Month: January 2023

राजकीय

मुंबईच्या सभेत महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर पंतप्रधान मोदींनी बोलावे !

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या […]Read More

महानगर

आमदार अपात्रता प्रकरणे हाताळण्याचा अधिकार अध्यक्षांचा …

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही बाजूने आमदारांना अपात्र ठरवण्याची विधानसभेत दाखल केलेली प्रकरणे याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनाच कायदा, नियम व कायदेशीर प्रक्रियेनुसार घ्यावा लागेल व त्यासाठी वेळ मर्यादा सांगता येणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी केले आहे. आमदारांना अपात्र ठरवायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्र […]Read More

ट्रेण्डिंग

उद्या पंतप्रधान मुंबईत , अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण..

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबई भेटीवर असून त्यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे. वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मैदानात गुरुवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमादरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतील २० नवीन दवाखान्यांचे […]Read More

राजकीय

दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त […]Read More

देश विदेश

शुभमन गिलचा विश्वविक्रम, रेकॉर्डब्रेक द्विशतक

राजकोट, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आज भारत- न्यूझिलॅंड दरम्यान झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने  149चेंडूत 208 धावांचा डोंगर उभारून विश्वविक्रम केला. यामुळे वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता, […]Read More

Featured

राज ठाकरे यांना जामीन मंजूर , ५००रुपये दंड…

बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): २००८ मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत अटक केली होती. या अटकेचे पडसाद परळीत उमटले होते. येथील धर्मापुरी पॉइंटवर कार्यकर्त्यांनी दगडफेकीत बसचे नुकसान केले होते. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर व चिथावणी दिल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.Raj Thackeray granted bail, Rs 500 fine… याप्रकरणी परळी न्यायालयाने त्यांच्या विरोधात […]Read More

राजकीय

राज्यातील या दोन विधानसभा मतदारसंघासाठी पोडनिवडणूका जाहीर

मुंबई,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील दोन जागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला. झाला. पुणे जिल्ह्यातील कसबापेठ मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. Maharashtra assembly bypoll Election 2023 या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज […]Read More

देश विदेश

ईशान्य भारतातील या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर

नवी दिल्ली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने आज त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. तिन्ही राज्यांमध्ये गेल्या वेळेप्रमाणे दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला एकाच वेळी मतदान होणार आहे. तीनही राज्यांचे निकाल 2 मार्चला येतील. त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता […]Read More

पर्यटन

हिवाळ्याच्या महिन्यांत हे एक मोहक ठिकाण…चोपटा

उत्तराखंड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उत्तराखंडमधील चोपटा येथे त्रिशूल, नंदा देवी आणि चौखंबा यांसारख्या बर्फाच्छादित शिखरांचे विहंगम दृश्य दिसते. या ठिकाणची शांतता, निसर्ग सौंदर्य आणि साहसाची हाक यामुळे हिवाळ्याच्या महिन्यांत हे एक मोहक ठिकाण बनते.A charming place during the winter months…Chopta चोपटा येथे पाहण्यासारखी ठिकाणे: देवरिया ता.तुंगनाथ, रोहिणी बुग्याल, ओंकार रत्नेश्वर महादे चोपटा येथे […]Read More

करिअर

एक्झिम बँकेत अधिकाऱ्यांच्या पदांवर भरती

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (EXIM बँक) ने अधिकारी पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सूचनेनुसार, एक्झिम बँकेत अधिकारी पदाची भरती कंत्राटी पद्धतीने होईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज एक्झिम बँकेच्या Exim Bank Recruitment for Officer Posts https://applyonlineeximb.com या लिंकला भेट देऊन करावा लागेल. अधिसूचनेनुसार, […]Read More