Month: January 2023

पर्यावरण

पूर प्रतिबंधक उपाय म्हणून कोकणातील ही नदी होणार गाळमुक्त

महाड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  सावित्री या कोकणातील महत्त्वाच्या नदीवर गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात येणाऱ्या प्रचंड पुरामुळे नदी काठावरील जनजीवन धोक्यात येते. महाड या सावित्री नदीच्या तीरावर वसलेल्या शहराला पूराचा सर्वांधिक धोका निर्माण होते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून आता सावित्री आणि तिच्या उपनद्यामध्ये साचलेला गाळ काढण्यात येणार आहे.  त्यामुळे महाड शहरामधील पूरस्थितीवर नियंत्रण […]Read More

Breaking News

मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ३० जानेवारीला तब्बल तीस परीक्षा होणार होत्या, मात्र त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. राज्यात लवकरच महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या परीक्षा कधी होणार याचीही माहिती देण्यात आली […]Read More

मराठवाडा

या गावात भरते महात्मा गांधींजींच्या नावाने यात्रा

लातुर,दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशासाठी आयुष्य वेचलेल्या महान नेत्यांच्या प्रभाव समाजमनावर वर्षानुवर्षे टिकून राहतो. ग्रामीण भागात काही ठिकाणी तर अशा महान व्यक्तींच्या कार्याबाबत आदर व्यक्त करण्यासाठी लोकपरंपरांचा आधार घेतला जातो. असाच एक विशेष उपक्रम लातुर जिल्ह्यातील उजेड या गावात आयोजित केला जाते. येथे दरवर्षी २४ ते २७ जानेवारी दरम्यान महात्मा गांधीजींच्या स्मृतीनिमित्त यात्रा […]Read More

Featured

विवोचा हा फोन बाजारात दाखल

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नुकताच विवोने वाय सीरीजमधील अजून एक नवीन 5G फोन लॉन्च केला आहे. Vivo Y55s 5G (2023) असे लॉन्च करण्यात आलेल्या नवीन फोनचे नाव आहे. याच नावाचा एक फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. मात्र हे मॉडेल चिनी फोनपेक्षा बरेच वेगळे आहे. Vivo Y55s 5G (2023) फोन […]Read More

Breaking News

पुणे शहरावर भीतीचे सावट भरदिवसा गोळीबार

पुणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात सनसिटी रोड येथे बांधकाम व्यावसायिकाने एकावर गोळी झाडल्याची धक्कादायक घडना घडली आहे.आज (२४ जानेवारी) भरदिवसा ही घटना घडली असून सगळीकडे खळबळ उडाली आहे.यामध्ये एकजण जखमी झाला आहे. या प्रकरणी गोळीबार करणार्‍या इसमास सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   fear on Pune city पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]Read More

Featured

लंडन सिटी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात कर्नाटकाचा झेंडा फडकला…

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोणत्याही देशात असलो तरी आपल्याला मायदेशाची,मायभूमीची ओढ कायमच असते. लंडन सिटी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या कर्नाटक रहिवासी एका विद्यार्थ्याने पदवीप्रदान सोहळ्यात असे काही केले की यामुळे प्रत्येक कर्नाटकवासियांना त्याचा अभिमान वाटला. कर्नाटकाचा रहिवासी असणारा हा विद्यार्थी लंडन येथील सिटी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेला होता. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर होणाऱ्या पदवीप्रदान सोहळ्यात […]Read More

Featured

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या ‘चावडी’वर रंगणार अघोषित आणीबाणीची चर्चा

ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने ‘चावडी’ हा एक नवा सार्वजनिक मंच सुरू करण्यात येणार आहे. चावडीच्या पहिल्याच कार्यक्रमात भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वाबाबत म्हणजेच ‘अघोषित आणीबाणी’बाबत विचारवंतांची व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा तथा ज्येष्ठ कवयित्री व लेखिका प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी दिली. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आयोजित ‘चावडी’चे […]Read More

Breaking News

आपल्यासाठी मातोश्री चे दरवाजे उध्दव ठाकरे यांनीच बंद केले आहेत

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला कसेही करून अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि मातोश्रीचे दरवाजे उध्दव ठाकरे यांनीच आपल्यासाठी बंद केले तरीही माझा त्यांच्यावर कोणताही वैयक्तिक आकस नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले.आपल्याला हर प्रकारे अडकवून अटक करण्याचे आदेश तत्कालीन […]Read More

देश विदेश

दिल्लीसह या राज्यांना भूकंपाचा धक्का

नवी दिल्ली,दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  प्रचंड थंडीमुळे गारठलेल्या उत्तर भारताला आज भूकंपाच्या धक्क्याने हादरवून सोडले. दिल्ली – NCRमध्ये आज दुपारी 2.28 वा. 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यात जवळपास 30 सेकंद जोरदार झटके बसले. भूकंपाचे केंद्र नेपाळच्या कालिकाहून 12 किमी अंतरावर होते. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत व चीनपर्यंत जाणवला. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातही या भूकंपाचे […]Read More

महानगर

शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे?

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून […]Read More