Month: December 2022

राजकीय

गायरान जमिनी बाबतचा निर्णय गरिबाला न्याय देण्यासाठीच

नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या सद्सद्विवेक बुध्दी नुसार , यापूर्वी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आणि सादर करण्यात आलेल्या पुराव्यानुसारच आपण आपल्याला प्राप्त अधिकारानुसार गायरान जमिनीचा निर्णय आपण त्यावेळी घेतला असा खुलासा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत केला. The decision regarding Graze land is to give justice to the poor विरोधी पक्षाच्या वतीने […]Read More

राजकीय

मुंबई ही महाराष्ट्राचीच

नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई ही महाराष्ट्राचीच असून कोणाच्याही बापाची नाही , मुंबईवर दावा खपवून घेतला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. कर्नाटक विधिमंडळात अशा प्रकारचा दावा झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्याचा तीव्र निषेध करण्याची मागणी करण्याची […]Read More

ट्रेण्डिंग

भारत बायोटेक ने जाहीर केली कोरोनाच्या नेझल लशीची किंमत

मुंबई,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक पातळीवर कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरू लागला असताना भारत सरकारही कोरोना प्रतिबंधासाठी सज्ज झाले आहे. देशांतील बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याने भारताला याचा धोका कमी संभवतो असे असले तरीही अधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणून नाकाद्वारा घेण्यात येणारी प्रतिबंधात्मक नेझल नस भारत बायोटेक द्वारा उपलब्ध करण्यात आली आहे. भारत […]Read More

क्रीडा

या खेळाडूने रणजी सामन्यात घेतल्या ८ ओव्हर्स मध्ये ८ विकेट्स

मुंबई,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  देशातील विविध राज्यांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळवले जाणारे रणजी सामने म्हणजे भारतीय संघात वर्णी लागण्यासाठी उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी. या सामन्यामधुन भारतीय क्रिकेट टिमला एकापेक्षा एक सरस खेळाडू मिळतात. आज अशाच एका खेळाडूने चक्क 8 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स घेऊन BCCI चे सचिव जय शहा यांची शाबासकी मिळवली आहे. रणजी ट्रॉफीमधील उत्तराखंड […]Read More

राजकीय

बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधिमंडळात

नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवन , मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात बसविले जाणार असून त्याचा अनावरण सोहळा ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी, २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भातील घोषणा विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी विधानसभेत केली . सर्व सदस्यांनी या संस्मरणीय सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक […]Read More

विदर्भ

विधान भवनावर अनेक मोर्चांची धडक

नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी दरवर्षी अधिवेशनाच्या दरम्यान विविध संघटनेच्या माध्यमातून मोर्चे काढले जातात काही संघटनांच्या मागण्या मान्य होतात तर काही संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे पुन्हा नव्या जोमाने मोर्चा काढत असतात. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात विविध संघटनाच्या माध्यमातून मोर्चे काढण्यात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूर कॉरिडॉर मध्ये कोणावरही अन्याय नाही

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा आणि देशाचा दृष्टीने पंढरपूर कॉरिडॉर हा महत्वाचा असून हा प्रकल्प पुढे नेत असतांना कोणत्याही परिस्थितीत कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री एमनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले . लाखो भाविकांचा दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असून सगळ्यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री यांनी केले. वाराणसीच्या […]Read More

राजकीय

सीमा भागातील मराठी बांधवांसाठी सरकारने घेतले हे निर्णय

नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांचा आणि सुरू केलेल्या योजनांविषयी मुख्यमंत्री […]Read More

राजकीय

तब्बल वीस वर्षे मुख्यमंत्रीपद असूनही विदर्भाचा विकास का नाही?

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भात तब्बल वीस वर्षे मुख्यमंत्रीपद असूनही मागासपणाबद्दल कायम पश्चिम महाराष्ट्राला का दोष देता असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला, नियम २९३ अन्वये सत्तारूढ पक्षाने उपस्थित केलेल्या विदर्भ , मराठवाडा विकास प्रश्नावरच्या चर्चेत ते बोलत होते. विदर्भात राजकीय शक्तीचा अभाव का आहे , इथल्या जिल्हा बँका […]Read More

राजकीय

अनिल देशमुख यांची उद्या सुटका

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने देशमुखांची बुधवारी ( २८ डिसेंबर ) कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला […]Read More