Month: December 2022

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 56.88 टक्के मतदान

मुंबई,दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 788 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद करणाऱ्या या मतदानात 56.88 टक्के मतदान झाले. आता 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी  93 जागांसाठी […]Read More

आरोग्य

रशियानं जीवंत केला महाभयंकर झोंबी व्हायरस

मुंबई,दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनामुळे संपूर्ण जगाने अभूतपूर्व गंभीर परिस्थिती अनुभवली असताना आता कोणताही नवा व्हायरस म्हटलं की काळजाचा थरकाप होतो. रशियन शास्त्रज्ञांनी आता 48 हजार पूर्वीचा बर्फाखाली दडलेली झोंबी हा व्हायरस एक्टीव्ह केला आहे. यामुळे जगभरात भीती पसरली आहे. रशियन शास्त्रज्ञांनी हा व्हायरस एक्टीव्ह केल्याचे फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ  […]Read More

राजकीय

आता या गावांना ही लागले इतर राज्यांचे वेध

मुंबई,दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील गावांवरील हक्कांबाबत वाद पेटलेला असताना कर्नाटक दररोज काही ना काही कारणास्तव महाराष्ट्राच्या कुरापती काढत आहे. त्यातच आता महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील गावांबरोबरच गुजरात आणि तेलंगणा सीमेवरील महाराष्ट्रातील काही गावे देखीाल त्या त्या राज्यामध्ये जाण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. नाशिकमधल्या काही गावच्या ग्रामस्थांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त […]Read More

ट्रेण्डिंग

कर्नाटकने पाणी सोडून पुन्हा डिवचले…

सांगली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जत तालुक्याच्या दुष्काळी भागात थेट पाणी सोडून कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. कर्नाटक सरकारकडून जतच्या तिकोंडी भागात आज सायफन पद्धतीने पाणी सोडण्यात आले. कर्नाटक भागातील तुरची बबलेश्वर पाणी योजना ओव्हरफ्लो करून दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडले.आधी कर्नाटकमध्ये येण्याचे निमंत्रण देऊन , आता थेट दुष्काळी भागातल्या गावात पाणी […]Read More

राजकीय

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये आता ‘ई-ऑफिस’ प्रणाली

मुंबई, दि.१(एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. ‘e-office’ system in government offices in the state केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या […]Read More

ट्रेण्डिंग

तरुणाने केला खेकडा शेतीचा प्रयोग यशस्वी ….

वसई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तरुणांकडून शेतीत घडून येणारे नवनवीन प्रयोग पाहता आजच्या काळात युवा तरुण आणि शेतीतले नवनवे प्रयोग याचं नातं काहीसं जवळचं होत चाललेलं दिसून येतं. आजचे युवा तरुण हे आपल्या वडीलोपार्जित शेतीत काही तरी नवीन आणि यशस्वी प्रयोग करताना आपल्याला नेहमीचं दिसून येतात. असाचं काहीसा अनोखा आणि नवा प्रयोग पालघर […]Read More

महानगर

तलवारीने केक कापणे महागात पडले

मुंबई, दि.1( एम एमसी न्यूज नेटवर्क): सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे विक्रोळी येथील तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या वाढदिवस सोहळ्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार हस्तगत करण्यात आली आहे. प्रदयुम गुलाब यादव (वय 25)असे या तरुणाचे नाव असून तो विक्रोळी माच्छी […]Read More

विदर्भ

प्रतिक्षा संपली, या दिवशी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, पंतप्रधानांच्या हस्ते

मुंबई,दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  मुंबई-नागपूर रस्ते प्रवासाचे अंतर लक्षणियरित्या कमी करणाऱ्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणास अखेर मुहूर्त सापडला आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी होणार आहे.  एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार ही माहिती दिली आहे.महामार्गावरील वायफड नाक्याजवळ […]Read More

महानगर

राणा दाम्पत्याच्या नावे नव्यानं वॉरंट जारी

मुंबई, दि.1( एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या’मातोश्री’ या खासगी निवासस्थाना बाहेरील हनुमान चालिसा पठण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नावे पुन्हा नव्यानं वॉरंट जारी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि […]Read More

कोकण

गड व किल्ले जतन-संवर्धन व मार्गदर्शन समिती सदस्यपदी प्रवीण कदम

अलिबाग, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नवीन पिढीला ओळख करुन देण्यासाठी तसेच राज्यातील गड व किल्ल्यांचे जतन-संवर्धन करण्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. Praveen Kadam as a member of Forts and Forts Preservation-Conservation […]Read More