Month: December 2022

पर्यावरण

वर्षभरात ४७४ संयत्र उभारणीचे नियोजन

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  घरगुती वापरासाठी प्रदुषण विरहित इंधन म्हणून उपयुक्त असलेल्या बायोगॅस संयत्र उभारणीचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आखले आहे. वर्षभरात ४७४ संयत्र उभारणीचे नियोजन आखले असून त्यासाठी प्रवर्गनिहाय आकाराप्रमाणे ९ हजार ८०० ते ७० हजार ४०० रूपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे […]Read More

ट्रेण्डिंग

चाॅकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा

नागपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरात अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने बर्डी येथील मदन गोपाल हायस्कूलमधील १७ मुलांना विषबाधा झाल्याने बर्डी येथीलच लता मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.17 children poisoned by eating chocolate या मुलांवर ताबडतोब प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. हर्ष देशमुख यांनी दिली. या मुलांना […]Read More

Featured

दिव्यांगावर मात करीत जयसिंगने मिळवायला राष्ट्रीय पुरस्कार …

नागपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जीवनात उंच भरारी घेण्याचे स्वप्न मनात बाळल्यास आणि त्यासाठी जिद्दीने, प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते हे नागपुरातील एका तब्बल 70% दिव्यांग असणाऱ्या जयसिंग चव्हाण यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. Jai Singh overcomes disability to win National Award… नागपूरात राहणाऱ्या जयसिंग चव्हाण यांना बालपणात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एका चुकीमुळे […]Read More

विदर्भ

विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग यांची निवड

नागपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या महिन्याच्या १६,१७ आणि १८ या तारखांना चंद्रपूर येथे आयोजित होणाऱ्या ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द समीक्षक आणि ललित लेखक म्हणून प्रसिध्द असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वि.स.जोग यांची संमेलनाध्यक्ष म्हणून विदर्भ साहित्य संघातर्फे निवड करण्यात आली. President of Vidarbha Sahitya Sammelan Dr. Vs. S. Jog’s choice चंद्रपूरची सर्वोदय शिक्षण […]Read More

ट्रेण्डिंग

डाॅ. मोहन आगाशे यांना गदिमा पुरस्कार जाहीर

मुंबई,दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने काल विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध चित्रकार साधना बहुळकर यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे. गदीमा प्रतिष्ठानचे अन्य पुरस्कार चैत्रबन पुरस्कार – […]Read More

ट्रेण्डिंग

शिवसन्मानासाठी आता चलो आझाद मैदान

महाड, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांबाबत लवकर कारवाई करा,आपण गप्प बसणार नाही असे सांगत उदयनराजे यांनी चलो आझाद मैदान अशी घोषणा केली आहे. Let’s go to Azad Maidan निर्धार शिवसन्मानाचा अशी मोहीम राबवून छत्रपती उदयनराजे यांनी आज किल्ले रायगडावर मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यपाल हे पद आदराचे आहे मात्र […]Read More

महानगर

भांडवली बाजाराचा (Stock Market) विक्रमी आठवडा.

मुंबई , दि. 3 (जितेश सावंत): भारतीय भांडवली बाजाराने सलग दुस-या आठवड्यात वाढीचा वेग कायम ठेवला व 2 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात नवीन विक्रमी उच्चांक गाठला.जागतिक महागाई कमी होणे,चीन मधील निर्बंध हटवून पुन्हा झालेली सुरुवात,अमेरिकन डॉलरची घसरण, क्रूड आणि वस्तूंच्या (कमोडिटी) किमतीतील घट, तसेच FIIची मजबूत खरेदी यामुळे या आठवड्यात बाजाराने नवीन विक्रमी शिखरे गाठली. […]Read More

Featured

अकोला जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार

अकोला, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिव्यांग सशक्तिकरण व दिव्यांगजनांसाठीच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमबजावणी केल्याची नोंद घेत केंद्र सरकारच्या वतीने अकोला जिल्हा परिषदेला 2021 राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आहे. आज जागतिक अपंगदिनी दिल्ली येथे देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. ही अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तत्कालीन पालकमंत्री […]Read More

राजकीय

तुकाराम गडाख यांचे निधन

अहमदनगर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्याचेअभ्यासू नेते असलेले माजी आमदार, माजी खासदार तुकाराम गडाख यांचं आकस्मिक निधन झालं. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना अहमदनगरच्या रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ हलविण्यात आलं होतंTukaram Gadakh passed away याच दरम्यान, रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. ते […]Read More

करिअर

पिंपरी चिंचवड पुणे मध्ये 285 शिक्षक पदांसाठी भरती

पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका (PCMC) मध्ये पदवीधर आणि सहाय्यक शिक्षक (PCMC भर्ती 2022) पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीला उपस्थित राहू इच्छिणारे पात्र उमेदवार PCMC pcmcindia.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सर्व तपशील मिळवू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे मुलाखतीची तारीख […]Read More