NEET पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी
पुणे, दि. १८ : NEET पेपरफुटी प्रकरणी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणातील अजून एका प्रसिद्ध व्यक्तीला CBI ने ताब्यात घेतले होते. लातूरमधील प्रसिद्ध क्लास RCC चा संस्थापक प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला CBI ने अटक केली आहे. शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर विशेष सीबीआय कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली. अखेर सीबीआय कोर्टाने शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
आता NEET परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे समजते. एकपेक्षा अधिक अधिकारी पेपरफुटी प्रकरणात असल्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली आहे. मोटेगावकरने विवेक पाटील याला नीटची प्रश्नपत्रिका पाठवल्याचे समोर आले आहे. नीट परीक्षेतले प्रश्न पहिल्यांदा हस्ताक्षरातील कॉपीमध्ये उत्तरासह पुढे पाठवण्यात आले.
टचा पेपर फुटल्याचे समोर आले. त्यानंतर NEET ची परीक्षा पुन्हा 3 मे रोजी होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अर्थातच NTA ने जाहीर केले. ही नवी तारीख जाहीर होताच RCC च्या शिवराज मोटेगावकरने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना जाहीर केली होती. त्यानुसार तो RCC च्या टॉप टेस्ट सीरिज विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देणार होता. तसा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. विशेष म्हणजे वन शॉट व्हिडिो ही ऑनलाइन उपलब्ध करून देणार होता. विद्यार्थ्यांना 21 मे पासून हे सारे काही मोफत मिळणार होते. मात्र, त्याआधीच मोटेगावकर सीबीआयच्या रडारवर आला