खासदार, आमदारांचे पेंशन,भत्ते बंद करण्यासाठी युवकांचे आझाद मैदानात बेमुदत आंदोलन
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासदार, आमदार, नगरसेवकांची पेंशन आणि भत्ते बंद करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील युवकांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन छेडले आहे. आपल्या देशातील राजकारण्यांच्या पैशांच्या हव्यासामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भर पडतोय. मासिक पेंशन आणि विविध सवलतींमुळे आणि हाच काही हजार कोटी रुपयांच्या घरात असलेला पैसा जर या मिळणाऱ्या पेंशनला कायमचे बंद केल्यास वाचू शकतो. या वाचलेल्या रकमेचा वापर अति ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणासाठी होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या किंवा निवृत्त झालेल्या नगरसेवक, आमदार आणि खासदार यांची पेंशन कायम स्वरूपी बंद करावी अशी मागणी राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करीत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातून आलेल्या जोतीराम चव्हाण, राजकुमार गडगळे आणि बाजीराव एकुरके यांनी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या संदर्भात जोतीराम चव्हाण म्हणाले, की आपल्या देशातील सर्व राज्यात, केंद्रशासित प्रदेशात आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व आजी व माजी आमदार यांना राज्य सरकार आणि आजी माजी खासदारांना केंद्र सरकार पेंन्शन आणि इतर सुख- सुविधा देतात. त्यामुळे एका मोठ्या रक्कमेची वर्षिक अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते. ही रक्कम देशातील अत्यंत महत्वाच्या लोक कल्याणकारी कामावर तसेच गोरगरिबांच्या विकासासाठी खर्च व्हायला हवा. तसे पाहता जे राजकीय नेते आमदार आणि खासदार म्हणून निवडून येतात ते आर्थिक दृष्टीने फारच सक्षम असतात.याउलट गरीब शेतकरी, मजूर वर्गाला आर्थिक परिस्थिती सामना करावा लागतो.गरिबी अजूनही दूर होत नाही,यासाठी आमदार खासदारांच्या पेंशनचा पैसा वापरल्यास या समस्या सुटतील असे या तरुणाच म्हणणं आहे .

PGB/ML/PGB
19 Aug 2024