एनडीए सरकार पुढील टर्ममध्ये महिला बिल पास करणारच – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि ७- एनडीए सरकारला 2029 मध्ये लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळेल. त्याअनुषंगाने इतरांनी जरी पाठिंबा नाही दिला तरी महिला विधेयक आम्ही पास करणार आहोत एवढं बहुमत एनडीए सरकारकडे असेल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
भाजपच्या महिला विधेयकानुसार लोकसभेत 543 जागांवरुन 816 जागा करुन मतदार संघ लहान करण्याचा प्रयत्न होता, मात्र राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी विरोध केला. त्यामुळे 2029 मध्ये महिलांना जे 50 टक्के आरक्षण मिळणार होतं ते मिळाले नाही. असे असले तरी पुढे बहुमताच्या जोरावर हे बिल पास करण्यात येईल. ना. रामदास आठवले तिसऱ्यांदा राज्यसभेत निवडून गेल्याने कुर्डुवाडी येथे त्यांचा रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बापूसाहेब जगताप, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, माजी आ. संजयमामा शिंदे, सुनील सर्वगोड, बालाजी शिरसकर, दशरथ कांबळे, शिवाजी कांबळे, बलवीर बनसोडे, दत्ताजी काकडे, निवृत्ती गोरे, संजय टोणपे, अमर माने, सविता जगताप, बंडू भोसले, सूरज जगताप, आकाश जगताप, जयश्री माने, लीना सुराणा, सुहास शेंडगे, साबीर चाऊस, आनंद कदम, दत्ताजी काकडे, दर्शन काशीद, डॉ. मोहसीन मकनू, सुरज जगताप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आ. संजयमामा शिंदे म्हणाले, बहुजन वर्गासाठी राज्यामध्ये गेली 50 वर्षे ना. रामदास आठवले यांनी सातत्याने काम केले आहे. कुर्डुवाडीतील रेल्वेच्या आजपर्यंतच्या प्रश्नांमध्ये सातत्याने लक्ष घालून काम केले आहे. भविष्यामध्येही विकासाच्या दृष्टीने आपण मदत कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.KK/ML/MS