महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा नवा लोगो, शिवरायांची प्रतिमा समाविष्ट
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या नव्या लोगोचे अनावरण आणि नव्या ऑफिसचे उदघाटन जेष्ठ नेते आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार बीसीसीआयचे खजिनदार ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या लोगोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या जुन्या लोगोमध्ये एका किल्ल्याची प्रतिमा, आणि त्यामध्ये बाजूला दोन बाण असलेले बॅच आकाराचे बोधचिन्ह होते. आता यामध्ये बदल करून भगव्या पार्श्वभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा छायांकित फोटो असलेला अष्टकोनी लोगो तयार करण्यात आला आहे. तसेच नव्या लोगोमध्ये दोन बॅट्स आणि एक बॉलही दाखवण्यात आला आहे.
TR/ML/PGB
13 Aug 2024