भांडवली बाजारात कोहराम. गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

 भांडवली बाजारात कोहराम. गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत
गेल्या महिनाभरात सेन्सेक्स आपल्या विक्रमी स्तरावरून जवळपास ३,००० अंकांनी घसरला.आठवड्याची सुरुवात आणि शेवट हा घसरणीनेच झाला. निफ्टीने १९ ऑक्टोबर २०२१ रोजी १८,६०४ हा उच्चतम स्तर गाठला होता Covid-19 मुळे २३ मार्च २०२० रोजी निफ्टीने ७,६१० हा तळ गाठला होता.तेव्हापासून सातत्याने निफ्टीत वाढ होत होती त्यामुळे बाजार घसरणार हे कुठेतरी गुंतवणूकदारांच्या मनात होतेच. परंतु याची अनेक कारणे आहेत ,काही दिवसापासून गुंतवणूकदारांना बाजाराचे वाढलेले valuation,जागतिक स्तरावर वाढलेली महागाई,FII ची विक्री याची चिंता सतावत होती त्यात भर पडली ती ,यूरोप व ऑस्ट्रेलिया मधील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ व लॉकडाउनची शक्यता त्यामुळे भीतीपोटी गुंतवणूकदारांचा कल नफावसुलीकडे वाढला.या आठवड्यात Reliance Industries आणि Saudi Aramco यांच्यातील करार रद्द होण्याची शक्यता,Paytm IPO fiasco,cryptocurrency Bill,F&O expiry याचा प्रभाव दिसला परंतु कामकाजाच्या शेवट्च्या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील करोनाचा नव्या व्हेरिएंटच्या बातमीने गुंतवणूकदार घाबरले नव्या विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था कमकुवत होईल या भीतीने जागतिक बाजारात विक्रीचा मारा सुरु झाला. काही देशांनी तर आफ्रिकेशी जोडणारी विमान सेवा तात्पुरती रद्द केली. आत्तापर्यंत FII नी भारतीय बाजारात कॅश मार्केट मध्ये नोव्हेंबर महिन्यात २५,३०० करोड रुपयांहून अधिक विक्री केली आहे. या घसरणीचा गुंतवणूकदारानी लाभ घेतला पाहिजे.A golden opportunity for investors

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष खास करून २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या G20 Finance and Health Ministers Meeting,संसंदेचे हिवाळी अधिवेशन, ३० नोव्हेंबर रोजी भारताचे Q2 GDP चे आकडे ,१ डिसेंबर रोजी – नोव्हेंबर ऑटो विक्रीचे आकडे( auto sales )या कडे असेल
बाजारात कोहराम सेन्सेक्स १५०० अंकांनी कोसळला

आठवडयाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार मोठ्या प्रमाणात गडगडला,बाजारासाठी काळा सोमवार ठरला.दिवसभरात सेन्सेक्स १५०० अंकांहून अधिक घसरला.जागतिक बाजारातील कमजोरी. FII ची विक्री ,यूरोप व ऑस्ट्रेलिया मधील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ व लॉकडाउनची शक्यता,Reliance Industries आणि Saudi Aramco यांच्यातील करार रद्द होण्याची शक्यता व त्यामुळे Reliance च्या शेअर मध्ये ४ %पेक्षा अधिक झालेली घसरण,Paytm IPO fiasco, बाजाराचे वाढलेले valuation ह्या सगळ्या गोष्टी बाजाराला गडगडण्यास कारणीभूत ठरल्या. बाजार बंद होताना सेन्सेक्स ११७० अंकांनी घसरून ५९,६३६ या स्तरावर बंद झाला व निफ्टी३४८ अंकांनी घसरून १७,४१७ चा बंद दिला.

बाजार सावरला. Market snaps 4-day losing streak

मंगळवारी बाजार सावरला. सोमवारच्या प्रचंड पडझडीनंतर मंगळवारी बाजार सकारात्मक बंद झाला.बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरला परंतु metal,power sector, pharma व PSU bank या क्षेत्रातील शेअर्स मधील खरेदीच्या जोरावर बाजाराला आधार मिळाला. Jerome Powell यांचे Fed chair म्हणून re-nomination होऊन देखील अमेरिकन बाजार सोमवारी बंद होताना थोडासा घसरला. बाजार बंद होताना सेन्सेक्स १९८ अंकांनी वधारून ५८,६६४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ८६ अंकांनी वधारून १७,५०३ चा बंद दिला.

सेन्सेक्स ३२३ अंकांनी घसरला. Sensex falls 323 points

मंगळवारच्या तेजीनंतर बुधवारी बाजारात पुन्हा एकदा मंदीवाल्यानी डोके वर काढले. बाजाराची सुरुवात चांगली झाली परंतु शेवटच्या तासात विक्रीचा मारा झाला. auto, IT आणि FMCG या क्षेत्रात जोरदार नफावसुली झाली. केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात (Winter Session) cryptocurrency Bill मांडणार असल्याची बातमी मंगळवारी संध्याकाळी आली आणि Bitcoin सहित उर्वरित cryptocurrency मध्ये जोडणार घसरण झाली. बुधवारी बाजारात चढ अधिक होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३२३ अंकांनी घसरून ५८,३४० या स्तरावर बंद झाला व निफ्टी ८८ अंकांनी घसरून १७,४१५ चा बंद दिला. Markets end lower in the volatile session dragged by the auto, IT, FMCG stocks, while banks provided some support.

रिलायन्स मधील तेजीमुळे सेन्सेक्स व निफ्टी वरच्या स्तरावर बंद. Sensex, Nifty End Higher Buoyed By Reliance’s Gains

गुरुवारी F&O expiry च्या दिवशी बाजाराची सुरुवात संमिश्र झाली. परंतु दुपारनंतर बाजारात तेजी पसरली. भारताचा आर्थिक वाढीचा दर चांगला राहण्याचे संकेत मूडीज या रेटिंग एजन्सीने दिल्याने बाजारावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडला त्याबरोबर Reliance Industries मधील तेजी बाजाराला वर नेण्यास कारणीभूत ठरली. Infosys,आणि ITC या समभागातील खरेदीने बाजाराला आधार मिळाला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४५४ अंकांनी वधारून ५८,७९५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १२१ अंकांनी वधारून १७,५३६ चा बंद दिला.

सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला. Black friday

बाजाराचा या आठवड्याचा शेवट देखील खराब झाला. डिसेंबर सिरीज च्या पहिल्याच दिवशी बाजार जबरदस्त कोसळला. या घसरणीचे मुख्य कारण दक्षिण आफ्रिकेतील करोनाचा नवा व्हेरिएंट. या विषाणूने आशियातील भांडवली बाजारांना जोरदार तडाखे दिले,भारतीय बाजार देखील यातून सुटले नाही.सेन्सेक्स दिवसभरात १८०० अंकांनी गडगडला.गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बाजारात चौफेर विक्रीचा मारा सुरु झाला. फार्मा क्षेत्र वगळता बाकी क्षेत्रात नफावसुली झाली.या नव्या विषाणूमुळे जागतिक बाजार कमकुवत झाले. युरोपियन युनियनने आफ्रिकेशी जोडणारी विमान सेवा तात्पुरती रद्द केली. .युरोप मधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ट्रेड व ट्रॅव्हल यात खीळ बसण्याची शक्यता निर्माण होण्यामुळे अजून एका चिंतेत भर पडली. बाजार बंद होताना सेन्सेक्स १,६८७ अंकांनी घसरून ५७,१०७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी५०९ अंकांनी घसरून १७,०२६ चा बंद दिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

27 Nov 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *