भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

 भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बँकांवरील भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) कडकप धोरण कायम आहे. अनेकदा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँक बँकांवर दंड आकारते. रिझर्व्ह बँकेने आता भारतीय स्टेट बँकेला (SBI) 1 कोटी रुपयांचा दंड (Fine) ठोठावला आहे. नियामक अनुपालनाअभावी रिझर्व्ह बँकेने हा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेच्या मते, आर्थिक स्थितीच्या संदर्भात, 31 मार्च 2018 ते 31 मार्च 2019 दरम्यान स्टेट बँकेच्या देखरेख संबंधी मूल्यांकनाबाबत वैधानिक निरीक्षण करण्यात आले होते.

आदेशानुसार, जोखीम मूल्यांकन अहवालाची तपासणीत, निरिक्षण अहवालात बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे आढळले. स्टेट बँकेने (SBI) कर्जदार कंपन्यांच्या बाबतीत कंपन्यांच्या पेड-अप भाग भांडवलाच्या तीस टक्क्यांहून अधिक रकमेचे समभाग तारण म्हणून ठेवले होते. रिझर्व्ह बँकेने (RBI) त्यानंतर याप्रकरणी भारतीय स्टेट बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकेच्या उत्तरावर विचार करून दंड (Fine) ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला.

रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबरमध्येही स्टेट बँकेला (SBI) 1 कोटी रुपयांचा दंड (Fine) ठोठावला होता. फसवणुकीचे वर्गीकरण आणि माहिती देण्याबाबत मध्यवर्ती बँकेने व्यावसायिक बँकांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला होता.

The Reserve Bank of India (RBI) has maintained a strict policy on banks. The Reserve Bank often imposes fines on banks for violating the rules. The Reserve Bank has now imposed a fine of Rs 1 crore on State Bank of India (SBI). The penalty was imposed by the Reserve Bank for non-compliance.

PL/KA/PL/27 NOV 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *