आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजाराची (Stock Market) धमाकेदार तेजी

 आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजाराची (Stock Market) धमाकेदार तेजी

मुंबई, दि. 31 (जितेश सावंत) : आर्थिक वर्ष 2023-24 मधील बाजाराचा शेवट जोरदार तेजीने झाला. शेवटच्या दिवशी बाजार विक्रमी उच्चांका जवळ गेला. सरत्या आर्थिक वर्षात निफ्टी 30% वाढून 2010 पासून सर्वात मोठा परतावा दिला.(Nifty rises 30% in FY24 to post biggest returns (ex-covid yr) since 2010) फक्त 2 निफ्टी स्टॉक (HDFC बँक आणि HUL) यांनी नकारात्मक परतावा दिला.(Only 2 Nifty stocks (HDFC Bank & HUL) give negative returns in FY24)

हे वर्ष सार्वत्रिक निवडणुकांचे (general election) असून या वर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसतील. As we approach this year’s general election, it’s worth noting that the market is likely to experience some fluctuations. However, with careful planning and a focus on long-term investments, it’s possible to navigate these changes and find growth opportunities.
पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने Auto Sales,RBI Policy (April 5 ),Domestic Economic Data (HSBC Manufacturing PMI data for March),Fed Chair Powell Speech (April 3),Oil Prices याकडे राहील.

Technical view on nifty

शुक्रवारी निफ्टीने 22326.9 चा बंद भाव दिला. निफ्टी साठी 22297-22278
-22239.80-22212 हे महत्वाचे सपोर्ट(Support)
आहेत. हे तोडल्यास निफ्टी 22183-22126- 22096.8-22040-20023-21962-21926-21812-21797-21740.80-21697-21640-21598-21576.05-21547-21517-21500 हे स्तर गाठेल.स्तरावर निफ्टी साठी -22343-22389-22440-22462 -22517 -22536
-22600-22687-22719
-22859 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

सेन्सेक्स 362 अंकांनी खाली आला.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजार अस्थिर अश्या सत्रात घसरताना दिसले.तीन दिवसांची सकारात्मकता बाजारातून नाहीशी झाली.कमकुवत सुरुवातीनंतर, बाजार नकारात्मक झोनमध्ये गेला परंतु ऑइल आणि गॅस मेटल, कॅपिटल गुड्स आणि रिॲल्टी समभागांमध्ये झालेल्या खरेदीने इंट्राडे रिकव्हरी झाली. पण पुन्हा विक्रीचा दबाव वाढल्याने बाजार घसरणीने बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी अर्ध्या टक्क्यांनी घसरले.
Sensex down 362 pts

सेन्सेक्स 526 अंकांनी वधारला

संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार सकारात्मक नोटवर सुरु झाला. तिसऱ्या तिमाहीत करंट अकाउंट डेफिसिट (CAD) मध्ये झालेली घट आणि बाजारातील हेवीवेट समभागामध्ये झालेली जोरदार खरेदी यामुळे बाजार वधारला. ऑटो, रियल्टी, पॉवर आणि कॅपिटल गुड्स समभागांमध्ये खरेदी झाल्याने बाजाराने मागील सत्रातील तोटा पुसून टाकला.
Sensex gains 526 points

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजार विक्रमी उच्चांका जवळ आर्थिक वर्ष 2023-24
मधील बाजाराच्या शेवटच्या सत्रात आणि F&O एक्स्पायरीच्या दिवशी तुफानी तेजी पाहावयास मिळाली.
सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची तर निफ्टीमध्ये 390 अंकांची वाढ झाली. सेंट्रल बँकेने अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (AIFs) मध्ये गुंतवणुकीसाठी अलीकडेच शिथिल केलेले नियम तसेच त्यामुळे बँक आणि आर्थिक क्षेत्रात झालेली तेजी, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी बुधवारी 2,170 कोटी रुपयांची केलेली भारतीय शेअर्सची खरेदी,यूएस बाजारातून आलेले मजबूत संकेत, या जोरावर बाजारात मोठी तेजी अनुभवयास मिळाली.निफ्टी आणि सेन्सेक्सने 22,500 आणि 74,000 ची पातळी ओलांडून त्यांच्या विक्रमी पातळीच्या जवळ जाण्यात यश मिळवले. परंतु शेवटच्या तासाच्या विक्रीने काही नफा पुसून टाकला गेला बाजार उच्चांकावरून खाली आला. Market nears record high on final trading day of FY24

(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)

jiteshsawant33@gmail.com

JS/ML/PGB
31 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *