रिझर्व्ह बँकेच्या(RBI Policy) पतधोरणाला बाजाराची पसंती.निफ्टी १८,००० उंबरठ्यावर

 रिझर्व्ह बँकेच्या(RBI Policy) पतधोरणाला बाजाराची पसंती.निफ्टी १८,००० उंबरठ्यावर

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बाजारासाठी हा आठवडा तेजीचा राहिला. जागतिक बाजारात वेगवान घडामोडी घडून सुद्धा निफ्टीने  विक्रमी स्तरावर बंद दिला. दुसऱ्या तिमाहीचे निकाल, फेस्टिवल सीझन मध्ये डिमांड वाढण्याची आशा,कोरोनाची दुसरी लाट तुलनात्मक दृष्टीने  कमी धोकादायक,रेटिंग कंपनी मूडीस ने वर्तविलेल्या अंदाज, आर.बी.आय पॉलिसी मधील स्थिर ठेवलेले व्याजदर आणि CPI इन्फ्लेशनच्या आकड्यातील घट यामुळे सेन्सेक्स ६०,००० च्या वरती बंद झाला व निफ्टीने नवा विक्रमी बंद दिला.

या आठवडयात रुपयाची घसरण झाली, International Monetary Fund ने  ग्लोबल ग्रोथ बाबत चिंता व्यक्त केली. Fitch  ने भारताचे रेटिंग कमी केले. क्रूड ऑइल मध्ये प्रचंड  वाढ झाली. या सगळ्याचा विचार सुद्धा गुंतवणूकदारांनी केला पाहिजे येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी.व खालच्या स्तरावर ऑटो,फार्मा, आय.टी व एफ.एम.सी.जी या क्षेत्रात गुंतवणूक करावी.

चार दिवसांच्या कमजोरीनंतर सेन्सेक्स व निफ्टीत तेजी . Sensex, Nifty Snap 4-Day Losing Streak. 

जागतिक बाजाराला संमिश्र प्रतिसाद असताना सुद्धा भारतीय बाजाराची सुरुवात तेजीने झाली. चार दिवसांच्या कमजोरीनंतर बाजाराने पुन्हा आपली घोडदौड चालू ठेवली.शुक्रवारी अमेरिकन बाजार देखील तेजीत बंद झाला.मेटल,रिअल इस्टेट, फार्मा या क्षेत्रात खरेदीचा ओघ होता. मिडकॅप इंडेक्स देखील तेजीत होता. साखरेपासून इथेनॉल बनवण्याच्या बातमीने शुगर सेक्टर मध्ये खूप तेजी  होती  बाजाराचे लक्ष फेस्टिवल डिमांड, दुसऱ्या तिमाहीचे निकाल तसेच ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या आर.बी.आय पॉलिसी कडे( RBI’s monetary policy committee will announce its decision on 8 October)  आहे.बाजाराला कोरोनाची दुसरी लाट तुलनात्मक दृष्टीने  कमी धोकादायक वाटत आहे व त्याचबरोबर येणाऱ्या  फेस्टिवल सीझन मध्ये डिमांड वाढण्याची शक्यता वाटत आहे.(anticipation of a better outlook from festival demand). दिवसभरात सेन्सेक्स ७०० अकांपेक्षा अधिक वाढला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५३४ अंकांनी वधारून  ५९,२९९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १५९ अंकांनी वधारून १७,६९१ चा बंद दिला.

Govt announces incentive for mills diverting sugar for ethanol production

दिवसभरातील चढ उतारानंतर सेन्सेक्स व निफ्टीचा सकारात्मक बंद. Sensex, Nifty End Higher For Second Session Despite Volatile Start. मंगळवारी बाजाराची सुरुवात नरमाईने  झाली. जागतिक बाजारच्या कमजोरीचा फटका भारतीय बाजाराला बसला. अमेरिकन बाजाराची निगेटिव क्लोजिंग व क्रूड ऑइल मधील वाढ हे बाजाराच्या कमजोरीचे कारण ठरले. परंतु दुपारनंतर यूरोपियन बाजारातील तेजीने आणि चीनची अर्थव्यवस्था संकट सापडल्यामुळे काही सेक्टरला त्याचा फायदा होईल या कारणाने भारतीय बाजारात जोश भरला मार्केट खालच्या स्तरावरून रिकव्हर झाले. ऑइल,गॅस,पॉवर ,केमिकल,IT क्षेत्रात चांगलीच खरेदी झाली. फार्मा ,मेटल,आणि रिअल इस्टेट क्षेत्रात दबावाचे वातावरण होते.बाजार बंद होताना सेन्सेक्स ४४५ अंकांनी वधारून  ५९,७४४या स्तरावर बंद झाला व निफ्टी १३१ अंकांनी वधारून १७,८२२ चा बंद दिला

1-Moody’s changes India’s rating outlook to stable from negative.

 

जागतिक बाजारातील कमजोरीचा फटका.  सेन्सेक्स ५५५ अंकांनी घसरला. Sensex tumbles 555 points on weak global cues

वीकली एक्सपायरीच्या दिवशी चांगलीच नफावसुली झाली. बाजाराची सुरुवात तेजीने झाली परंतु तेजी टिकली नाही.रुपयाची सुरुवात सुद्धा नरमाईने झाली. रुपयाने दोन महिन्याच्या तळ गाठला (Rupee at a nearly 2-month low against the US dollar).आय.एम.एफ ने  International Monetary Fund (IMF) जुलै महिन्यात वर्तविलेल्या ग्लोबल ग्रोथ बाबत चिंता व्यक्त केल्याने बाजारात  घसरण  वाढली ((IMF) said that growth in 2021 would likely fall short of its July forecast of 6 percent.). सगळ्या क्षेत्रातील समभाग घसरले. IT, metal, pharma, auto, आणि PSU bank मध्ये १-३ % घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५५५ अंकांनी घसरून  ५९,१८९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १९३  अंकांनी घसरून  १७,६२८ चा बंद दिला.

1-Govt Amends Rules To Allow 50% Sale Of Coal From Captive Mines. 2-Raymond Realty plans to develop ‘Grade A’ commercial and high street retail space at Thane land spread across 9.5 acres

 

आर.बी.आय पॉलिसी अगोदर बाजारात उसळी.Market rebounds before RBI policy

गुरुवारी भारतीय बाजारात जोश होता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात तेजीने झाली व सत्र बंद होईपर्यंत तेजी टिकून राहिली. बुधवारची घसरण मार्केटने भरून काढली.  शुक्रवारी होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी अगोदर बाजाराने उसळी मारली. ( Indian stock market rebounded on thursday – a day before the Reserve Bank’s monetary policy announcement.). ऑइल आणि गॅस वगळता उर्वरित क्षेत्रात तेजी होती.खास करून  Auto आणि IT,real estate  इंडेक्स ने कमाल केली.बाजार बंद होताना सेन्सेक्स ४८८अंकांनी वधारून  ५९,६७७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १४४ अंकांनी वधारून १७,७९०चा बंद दिला.

1-Reliance Retail to open 7-Eleven stores in India.

 

Fitch cuts India’s FY22 GDP growth forecast to 8.7%

 

Nifty closed at record high while Sensex ended a few points shy of an all-time high after RBI kept the key benchmark rates unchanged

बाजाराने आपला तेजीचा मूड शुक्रवारीसुद्धा कायम राखला. बाजाराला आर.बी.आय पॉलिसी पसंत पडली व बाजरात तेजी पसरली निफ्टीने  विक्रमी स्तरावर बंद दिला.  आशियाई बाजारातील सकारात्मकता .आय.टी (IT ) क्षेत्रातील तेजी व Reliance समभागातील वाढीचा तेजीला हातभार लागला. बाजाराचे लक्ष संध्याकाळी जाहीर होणाऱ्या US jobs data कडे सुद्धा होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३८१ अंकांनी वधारून ६०,०५९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १०४ अंकांनी वधारून १७,८९५ चा बंद दिला.

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market

jiteshsawant33@gmail.com  

ML/KA/PGB
9 Oct 2021

mmc

Related post