परदेशी गुंतवणूकदारांनी केली 1,997 कोटी रुपयांची गुंतवणूक

 परदेशी गुंतवणूकदारांनी केली 1,997 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) भारतीय बाजारात (Indian market) निव्वळ खरेदीदार बनले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान भारतीय बाजारात 1,997 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. या पार्श्वभुमीवर दीर्घकालीन दृष्टीकोनातून परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण बनले आहे.
डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये समभागांमध्ये 1,530 कोटी आणि कर्ज किंवा रोखे बाजारात 467 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशा प्रकारे त्यांची निव्वळ गुंतवणूक 1,997 कोटी रुपये झाली आहे. याआधी परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात 26,517 कोटी आणि ऑगस्टमध्ये 16,459 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

तज्ञ काय म्हणतात

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की अलीकडच्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी बँकिंग क्षेत्रातून आपली गुंतवणूक काढली आहे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे. मॉर्निंगस्टार इंडियाचे संशोधन सहयोगी संचालक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले. दीर्घकालीन दृष्टीकोनातून, भारत एक महत्त्वाचा आणि स्पर्धात्मक गुंतवणूक ठिकाण बनले आहे. भारतीय समभागांमध्ये परदेशी गुंतवणूक प्रवाह नियमित कालावधित सुरु आहे.
Foreign portfolio investors (FPIs) have become net buyers in the Indian market. FPIs have made a net investment of Rs 1,997 crore in the Indian market between October 1 and 8. Against this backdrop, India has become a lucrative investment destination for foreign investors in the long run.
PL/KA/PL/11 OCT 2021

mmc

Related post