वायदे बाजारात सेबी देणार परदेशी गुंतवणूकदारांना मान्यता

 वायदे बाजारात सेबी देणार परदेशी गुंतवणूकदारांना मान्यता

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी (FPI) वायदे बाजार (commodity market) खुला करण्याच्या तयारीत आहे. सेबीने स्थापन केलेली कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज अॅडव्हायझरी कमिटी (CDAC) पुढील आठवड्यात या विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने माहिती दिली की सेबी (SEBI) वायदे बाजारात (commodity market) परदेशी गुंतवणूकदारांना (FPI) नव्या खेळाडुच्या स्वरुपात सादर करण्याच्या तयारीत आहे. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज अॅडव्हायझरी कमिटीने त्याला मान्यता दिली, तर नियामक देखील या मुद्द्यावर बाजाराचा विचार करू शकेल. अन्य एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सेबी सुरुवातीला बिगर कृषी विभागासह परदेशी गुंतवणूकदारांना मंजूरी देण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर कृषी विभागात मान्यता दिली जाईल. तज्ञ सदस्यांच्या समितीची 15 नोव्हेंबरला बैठक होऊ शकते.
याआधी सेबीने (SEBI) वायदे बाजारात (commodity market) एलिजिबल फॉरेन एंटीटीजना (EFE) मान्यता दिली आहे. एलिजिबल फॉरेन एंटीटीज भारतातून निर्यात आणि आयात करतात आणि देशांतर्गत वायदे बाजारात स्वत:चे स्थान निर्माण करू शकतात. मात्र, गेल्या तीन वर्षांत या श्रेणीत केवळ एकाच कंपनीची नोंदणी झाली आहे.

सीडीएसी सदस्य आणि कमोडिटी पार्टिसिपंट असोसिएशन ऑफ इंडिया (CPAI) चे अध्यक्ष नरेंद्र वाधवा यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की वायदे बाजारच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी 3 पी ची आवश्यकता आहे. हे 3 पी म्हणजे उत्पादने, धोरणे आणि सहभागी आहेत. आता सेबीच्या व्यावहारिक निर्णयामुळे हे सर्व पी आपल्याकडे उपलब्ध आहेत. सेबी ने गेल्या 3 वर्षात पहिल्या टप्प्यात AIF, MF आणि PMS सारख्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना वायदे बाजारात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात, परदेशी गुंतवणूकदार (FPI) हे महत्त्वाचे भागीदार आहेत ज्यांना कोणत्याही निर्बंधांशिवायव्यादे बाजारात व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
The Securities and Exchange Board of India (SEBI), the market regulator, is preparing to open the commodity market for foreign portfolio investors (FPIs). The Commodity Derivatives Advisory Committee (CDAC) set up by SEBI is expected to discuss the matter next week.
PL/KA/PL/11 NOV 2021

mmc

Related post