परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये केली 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक

 परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये केली 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात (Indian Market) 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या 15 दिवसांत, भारतीय शेअर बाजारातील ‘करेक्शन’ दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक वाढवली आहे. ऑक्टोबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 12,437 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली होती.

डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, 1 ते 26 नोव्हेंबर दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) समभागांमध्ये 1,400 कोटी रुपये आणि कर्ज किंवा रोखे बाजारामध्ये 3,919 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. अशा प्रकारे त्यांची एकूण निव्वळ गुंतवणूक 5,319 कोटी रुपये होती.

 

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे गुंतवणूक धोरण प्रमुख व्ही.के. विजयकुमार यांनी सांगितले की परदेशी गुंतवणूकदारांकडे (FPI) मोठ्या प्रमाणात बँकांचे समभाग आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली. सततच्या विक्रीमुळे, बँकांचे समभाग मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून आकर्षक गुंतवणूक पर्याय बनले आहेत.

 

व्ही के विजयकुमार पुढे म्हणाले की, 26 नोव्हेंबरला भारतीय बाजारात (Indian Market) घसरण होण्याचे मुख्य कारण कोरोना विषाणूचा नवीन ‘प्रकार’ आहे. मॉर्निंगस्टार इंडियाचे सहयोगी संचालक-व्यवस्थापक (संशोधन), हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की या घसरणीनंतरही, बाजार अजूनही उच्च पातळीवर आहे. अशा परिस्थितीत, परदेशी गुंतवणूकदार (FPI) कदाचित नफा कमावत आहेत.

Foreign portfolio investors (FPI) have so far invested Rs 5,319 crore in the Indian market in November. In the last 15 days, foreign investors have increased their investments during the ‘correction’ in the Indian stock market. Foreign investors had net sales of Rs 12,437 crore in October.

PL/KA/PL/29 NOV 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *