विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढले 949 कोटी रुपये

 विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढले 949 कोटी रुपये

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) नोव्हेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत भारतीय बाजारातून (Indian market) 949 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी, 1 ते 12 नोव्हेंबर दरम्यान इक्विटीमधून 4,694 कोटी रुपये काढले. त्याच वेळी त्यांनी कर्ज किंवा रोखे बाजारात 3,745 कोटी रुपये गुंतवले. अशा प्रकारे त्यांनी निव्वळ 949 कोटी रुपये काढले. ऑक्टोबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांची निव्वळ विक्री रु. 12,437 कोटी होती.

मॉर्निंगस्टार इंडियाचे सहसंचालक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की , विदेशी गुंतवणूकदार (FPI) भारतीय बाजारातील (Indian market) समभागांच्या वाढत्या किंमतींबाबत चिंतित आहेत. शेअर बाजार सध्या त्याच्या सर्वकालीन उच्च पातळीजवळ आहेत. वाढत्या किंमतींमुळे विदेशू गुंतवणूकदार नफा वसूल करत आहेत. गेल्या काही आठवड्यांच्या प्रवाहाच्या कलावरून याचे संकेत प्राप्त होतात. याशिवाय जागतिक स्तरावर महागाईचा दबाव आणि काही विकसित अर्थव्यवस्थांमधील मंदी हे देखील चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की, गुंतवणूकदार वाढत्या किंमतींच्या चिंतेमुळे बाहेर पडत आहेत असे वाटत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या परिस्थितीत विदेशी गुंतवणूकदार (FPI) ‘स्मार्ट मनी’सह बाजाराची दिशा ठरवत असत. आता हा दृष्टिकोन बदलला आहे. आम्ही अनिश्चिततेच्या काळात आहोत.

 

Foreign portfolio investors (FPI) pulled out Rs 949 crore from the Indian market in the first 15 days of November. According to depository data, foreign investors withdrew Rs 4,694 crore from equities between November 1 and 12. At the same time, they invested Rs 3,745 crore in the debt or bond market.

PL/KA/PL/15 NOV 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *