वरळी पोद्दार रुग्णालयात आयसीयू विभाग सुरू करा, रुग्णालयाबाहेर विविध संस्थांचे आंदोलन सुरू

 वरळी पोद्दार रुग्णालयात आयसीयू विभाग सुरू करा, रुग्णालयाबाहेर विविध संस्थांचे आंदोलन सुरू

मुंबई प्रतिनिधी
वरळी येथील पोद्दार रुग्णालयात आयसीयू (ICU) विभाग सुरू करण्यात यावा, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विविध सामाजिक संस्था मागील अनेक वर्षांपासून शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. परंतु त्याचा काहीच उपयोग नाही झाल्यामुळे आज विविध संस्थांनी आणि अनेक नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन केले. विशेष म्हणजे, सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या हस्तक्षेपानंतर, राज्य सरकारने ९ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोगासमोर लेखी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्राद्वारे रुग्णालयात ३० खाटांचा आयसीयू विभाग सुरू करण्याची हमी देण्यात आली होती. मात्र, अद्याप या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.

रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, आपत्कालीन परिस्थितीत त्यांना अन्य रुग्णालयांत धावपळ करावी लागू नये आणि परिसरातील नागरिकांना हक्काच्या ठिकाणी अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या न्याय्य मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज संविधान दिनाचे औचित्य साधून मिशन माणुसकी संस्थेच्या वतीने वरळी, बीडीडी चाळ क्र. १ येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणस्थळी आमदार आदित्यजी ठाकरे आणि आमदार सुनिल शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शविला व आगामी हिवाळी अधिवेशनात याबाबत पाठपुरावा करण्याबाबत आश्वस्त केले.
वरळी येथील पोद्दार रुग्णालयात आयसीयू विभाग सुरू करण्याबाबत अनेक आंदोलने झाली. वारंवार आश्वासन मिळाली परंतु हा विभाग काही सुरू झाला नाही त्यामुळे येथील त्रस्त नागरिकांनी आणि विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे त्याला आमचा पाठिंबा असून जोपर्यंत या ठिकाणी आयसीय विभाग सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही देखील या आंदोलनाला सहभागी होणार अशी माहिती शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी या ठिकाणी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *