सौरऊर्जेने झळाळणार रायगडासह अकरा किल्ले

 सौरऊर्जेने झळाळणार रायगडासह अकरा किल्ले

मुंबई, दि. २६ : स्वराज्याची राजधानी रायगडासह राज्यातील ११ गड आता सौरऊर्जेने झळकणार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सिद्धेश कदम यांनी रायगड किल्ल्यावर सौर ऊर्जेचा वापर करून प्रकाशाची व्यवस्था करणार असल्याची माहिती दिली आहे. यासह, राज्यातील एकूण अकरा युनेस्को वारसा दर्जा प्राप्त किल्ल्यांवर शुद्ध पाण्याची व्यवस्था आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्याने घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येणार आहे. संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कदम यांनी ही घोषणा केली.

ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. गेले सहा महिने, 23 जानेवारीपासून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त, या अकरा किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. शिवप्रेमी आणि गडमित्र यात सक्रिय सहभाग घेत आहेत. केवळ गडकिल्लेच नव्हे, तर शेतकरी बांधवांसाठीही एमपीसीबी आणि पर्यावरण खात्यामार्फत ईव्ही ट्रॅक्टर धोरण आणले जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले. हे सर्व उपक्रम शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *