या राज्यात पुरुषांनाही मिळणार पितृत्व रजा

 या राज्यात पुरुषांनाही मिळणार पितृत्व रजा

चेन्नई, दि. २६ : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पितृत्व रजा सुरू करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील महिला सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 365 दिवसांची प्रसूती रजा मिळते. पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही पितृत्व रजा सुरू करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. बाळाच्या जन्माच्या काळात आईला शारीरिक आणि भावनिक आधार देण्यासाठी तसेच नवजात बाळाची देखभाल करण्यासाठी वडिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत सरकारने मांडले आहे. तमिळनाडूमध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांना 365 दिवसांची प्रसूती रजा (Maternity Leave) मिळण्याचा अधिकार आहे, तर पुरुष कर्मचारीही अशाच प्रकारच्या पितृत्व रजेची (Paternity Leave) मागणी करत होते. त्यांच्या या विनंतीचा विचार करून, सरकारने आता 15 दिवसांची पितृत्व रजा मंजूर करण्याचा आदेश जारी केला आहे.

मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी गुरुवारी पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 15दिवसांच्या पितृत्व रजेची (paternity leave) घोषणा केली. राज्यात अशा प्रकारची सवलत देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अधिकृत निवेदनानुसार, या नवीन तरतुदींतर्गत, विवाहित पुरुष सरकारी कर्मचारी बाळाच्या जन्माच्या अपेक्षित तारखेच्या 15 दिवस आधी किंवा बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत, अशा प्रकारे एकूण 15 दिवसांची रजा घेऊ शकतात.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या घोषणेत म्हटले आहे, “तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच पितृत्व रजा! विवाहित पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची पितृत्व रजा दिली जाईल. ही रजा बाळाच्या जन्माच्या 15 दिवस आधी किंवा जन्माच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत घेता येईल.” राज्य सरकारने म्हटले आहे की, बाळाच्या जन्माच्या आसपासचा काळ माता आणि नवजात बालक या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी मातेला शारीरिक व भावनिक आधार देण्यासाठी आणि बाळाच्या देखभालीत मदत करण्यासाठी वडिलांची उपस्थिती आवश्यक असते.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *