पॅकेटबंद खाद्यपदार्थांबाबत FSSAI ला न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश

 पॅकेटबंद खाद्यपदार्थांबाबत FSSAI ला न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश

नवी दिल्ली, दि. २६ : सर्वोच्च न्यायालयाने FSSAI ला पॅकेटबंद खाद्यपदार्थांमध्ये मीठ, साखर आणि सॅचुरेटेड फॅट नियंत्रीत करण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वं आणि नियम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. खाद्यपदार्थात असलेली एकूण साखर आणि सॅचुरेटेड फॅट यालाच इशाऱ्याचा निकष मानण्यात यावं, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं सांगितलं की, मीठ, एकूण साखर आणि सॅचुरेटेड फॅटची कमाल मर्यादा नव्याने निश्चित केली जावी. इशाऱ्यासाठी ठरवलेली मर्यादा इतकी कमी नसावी की प्रत्येक पॅकेटवरच इशारा छापावा लागेल आणि इतकीही जास्त नसावी की आरोग्याला हानी पोहोचवणारे प्रमाण त्यातून सुटून जाईल.

मुले आणि सर्वसामान्य नागरिकांना पॅकेटबंद खाद्यपदार्थांतील पोषक घटक आणि त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत जागरूक करणं अत्यंत गरजेचं असल्याचं खंडपीठानं अधोरेखित केलं. या निर्देशांच्या आधारे FSSAI ने मसुदा नियम (Draft Rules) तयार करावेत आणि संबंधित घटकांकडून सूचना व हरकती मागवाव्यात, असं कोर्टाने सांगितलं आहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, खाद्यपदार्थाच्या पॅकेटच्या मुख्य दर्शनी भागावर 3 स्वतंत्र षटकोन (Hexagon) तयार करावेत. त्यामध्ये अनुक्रमे High Fat, High Sugar आणि High Salt असे स्पष्टपणे लिहिले जावे. प्रत्येक षटकोन पॅकेटच्या मुख्य क्षेत्राच्या किमान 4 ते 5 टक्के जागा व्यापेल, याची काळजी घ्यावी. या षटकोनांमध्ये लिहिलेल्या शब्दांचा फॉन्ट इतका मोठा आणि स्पष्ट असावा की सर्वसामान्य ग्राहकांना तो सहज वाचता येईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 आठवड्यांनंतर होणार असून, मसुदा नियम तयार झाले आहेत की नाही, याची माहिती कोर्ट त्यावेळी घेईल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *