कांद्याची निर्यात बंदी नाहीच तर केवळ काही निर्बंध…

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्यावरील निर्यात निर्बंध मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी, नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. कांद्याची आयात करावी लागू नये म्हणून केंद्राने दक्षता घेतली आहे असे आज केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी म्हटले आहे.
कांद्याची निर्यात बंदी झालेली नाही तर थोडे निर्बंध आले आहेत. देशांतर्गत मागणी पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी तसे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी झाल्यास भविष्यात कांदा आयात करावा लागला तर तो अधिक महाग ठरेल त्यामुळे निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे असे डॉ पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
देशात महागाई वाढल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे मात्र देशाची सुरू असलेली प्रगती आणि जगातील अन्य देशाच्या आर्थिक स्थितीचा विचार करताना देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश घडत आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली . निर्यात शुल्क वाढीबाबतही पुनर्विचार करण्यासाठी संबंधित मंत्री आणि मंत्रालयाला आपण विनंती करू असे डॉक्टर पवार यावेळी म्हणाल्या.
ML/KA/SL
21 Aug 2023