बहुतांशी बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद ठेवले. पिंपळगाव बसवंत, विंचूर यासह काही बाजार समितीमध्ये कांद्याचे किरकोळ लिलाव झाले मात्र बहुतांशी ठिकाणी लिलाव बंद होते.
येवला येथे कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ मनमाड मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनही केलं तर जिल्ह्यात ठीक ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देण्यात आली .चांदवड तालुक्यात माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निर्यात शुल्क कमी करावे यासाठी निवेदन देण्यात आले तर नाशिक मध्ये स्वराज्य पक्षाचे संपर्क प्रमुख करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
ML/KA/SL
21 Aug 2023