अर्थमंत्र्यांच्या मुलीचे लग्न अगदी साधेपणाने, एकाही VIP ला निमंत्रण नाही

 अर्थमंत्र्यांच्या मुलीचे लग्न अगदी साधेपणाने, एकाही VIP ला निमंत्रण नाही

बंगळुरु, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्यांच्या साध्या राहणीसाठी नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचे परकलाचे लग्न अगदी साध्या पद्धतीने करून मुलामुलींच्या लग्नांत करोडोंची उधळण करणाऱ्या राजकीय नेत्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांची काल मुलगी परकला वांगमयी हिचा विवाह साधेपणाने केला. बंगळुरू येथील त्यांच्या घरी लग्नाचे विधी पार पडले. लग्नसोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रमंडळीच उपस्थित होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नात कोणत्याही नेत्याला किंवा व्हीआयपी पाहुण्याला आमंत्रित करण्यात आले नव्हते. सीतारामन यांचे जावई प्रतीक दोशी हे गुजरातचे रहिवासी असून ते पंतप्रधान कार्यालयात विशेष कर्तव्य अधिकारी आहेत.

सीतारामन यांची मुलगी परकला आणि प्रतीक यांचा विवाह ब्राह्मण परंपरेने झाला. उडुपी अदमारू मठाच्या संतांनी जोडप्याला आशीर्वाद दिले आणि लग्नाचे सर्व विधी पार पाडले. परकलाने लग्नासाठी गुलाबी परिधान केली होती, तर प्रतीकने पांढरा पंचा आणि शाल परिधान केली होती. सीतारामन यांनी मोलाकलमुरू साडी नेसली होती.

सीतारामन यांचे जावई प्रतीक हे पंतप्रधान मोदींचे खास सहकारी आहेत. ते पंतप्रधान कार्यालयात विशेष कर्तव्य अधिकारी आहेत. ते 2014 पासून पीएमओमध्ये कार्यरत आहेत. त्यांना 2019 मध्ये सहसचिव पद देण्यात आले आणि त्यांना ओएसडी बनवण्यात आले. ते संशोधन आणि रणनीतीचे काम पाहतात. प्रतीक सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलचा पदवीधर आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रतीक त्यांच्या कार्यालयात संशोधन सहाय्यक होते.

निर्मला यांची कन्या परकला वांगमयी मिंट लाउंजमध्ये फीचर रायटर आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी मेडिल स्कूल ऑफ जर्नलिझम, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी, यूएसए येथेही शिक्षण घेतले.
निर्मला यांचे पती परकला प्रभाकर हे राजकीय अर्थतज्ज्ञ आहेत. ते जुलै 2014 ते जून 2018 पर्यंत आंध्र प्रदेश सरकारचे दळणवळण सल्लागार होते.

SL/KA/SL
9 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *