महाराष्ट्रातील या शहरात चक्क आजी-माजी मद्यपींचे संमेलन

 महाराष्ट्रातील या शहरात चक्क आजी-माजी मद्यपींचे संमेलन

अमरावती, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती शहरातील नवाथे रेल्वे क्रॉसिंग परिसरातील साईकृष्ण मंगल कार्यालयात उद्या (दि. १० जून) दुपारी चक्क आजी-माजी मद्यपींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मद्याच्या व्यसनामुळे घर संसार उद्ध्वस्थ झाल्याच्या घटना समाजात घडताना आपण पाहतो.विशेष म्हणजे मद्यापासून होणाऱ्या या दुर्दशेची कल्पना मद्यपींना देखील असते. मात्र कुणीही दिलेले सल्ले ऐकण्याच्या मनःस्थितीत ते नसतात. त्यामुळे कुटुंबीयसुद्धा त्रस्त होतात. अशा परिस्थितीत अल्कोहलिक्स अ‍ॅनानिमस या संस्थेच्या पुढाकारातून शहरातील जवळपास २०० युवक व नागरिकांना स्वतःला आलेल्या वाईट अनुभव दुसऱ्यांना येऊ नये, या हेतूने या चळवळीत आपले सहकार्य दिले आहे.

मद्याच्या आहारी गेलेल्या मात्र मद्यापासून मुक्तता मिळविलेले डॉक्टर्स, प्राध्यापक, अभियंते तसेच सर्वसामान्यांचा समावेश आहे. ही मंडळी या संमेलनाच्या माध्यमातून त्यांना स्वतःला आलेले अनुभव कथन करून दुसऱ्यांना मद्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

विशेष म्हणजे, अशाप्रकारचे अधिवेशन आतापर्यंत पुणे, नागपूर येथे झालेले आहे. आता अमरावतीमध्ये होणार आहे. या अधिवेशनातील मार्गदर्शक असलेली व्यक्ती स्वतःचे आडनाव न सांगता केवळ आपले नाव आणि नावासमोर दारुड्या, हा शब्द आवर्जून लावतात. त्यामुळे सभागृहात उपस्थित अन्य मद्यपींचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, असे आयोजकांचे म्हणणे आहे

समाजाच्या विविध स्तरावर कार्य करणाऱ्यांचे संमेलन आजवर आपण ऐकले आणि पाहिले असेल. मात्र आता अमरावती शहरात चक्क मद्यपींचे संमेलन होणार आहे. विशेष म्हणजे या संमेलनाला आजी व माजी मद्यपी उपस्थित राहून अनुभव कथन करणार आहेत.

SL/KA/SL
9 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *