इथे होणार देशातील पहिले 3D पोस्ट ऑफीस

बंगळुरू, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 3D प्रिंट तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील पहिले पोस्ट ऑफिस तयार करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रम बंगळुरू मध्ये सुरू होत आहे. पोस्ट ऑफिस अवघ्या महिनाभरात तयार होईल. हालासुरूच्या केंब्रिज लेआउटमध्ये टपाल खात्याच्या मालकीच्या भूखंडावर पोस्ट ऑफिस सुरू केले जाईल.
या 1,000 स्क्वेअर-फूट इमारतीच्या उभारणीसाठी 25 लाख रुपये खर्च येणार असून या तंत्रज्ञानामुळे उभारणी खर्चात २५ टक्के बचत होणार आहे. थ्रीडी प्रिंट तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले पोस्ट ऑफिस सामान्य पोस्ट ऑफिसप्रमाणेच काम करेल.
IIT-मद्राससह गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या बांधकाम साहित्य आणि तंत्रज्ञान संवर्धन परिषदेने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (L&T) ला जमिनीपासून तीन मजल्यापर्यंत चालणाऱ्या स्ट्रक्चर्सच्या 3D काँक्रीट प्रिंटिंगसाठी ‘तंत्रज्ञान मान्यता’ दिली आहे. . इमारतीचे डिझाईन टपाल विभागाकडे सादर केले गेले आहे आणि जर सर्व काही नियोजीत वेळेनुसार पार पडले तर, बेंगळुरूला लवकरच देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस दिसेल.
SL/KA/SL
11 April 2023