मुंबईत सुरु होणार अँपलचे देशातील पहिले स्टोअर

 मुंबईत सुरु होणार अँपलचे देशातील पहिले स्टोअर

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अँपल कंपनी भारतातील आपले पहिले अधिकृत अॅपल स्टोअर १८ एप्रिलला मुंबईत सुरु करणार आहे. बीकेसीमधील रिलायंन्स जिओ वर्ल्डमध्ये अॅपल स्टोअर सुरु होईल. तर दुसरे एपल स्टोर २० एप्रिल रोजी दिल्लीच्या साकेत भागात उघडणार आहे. अॅपल कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली आहे.

अॅपल स्टोअर उघडण्याच्या बातमीमुळे मुंबईतील मोबाईल विक्रेते आणि रिटेलर्समध्ये धाकधुक निर्माण झाली आहे.

देशात अधिकृत अॅपल स्टोअर नसताना कंपनी आपले उत्पादन अॅपल प्रिमीयम रिसेलर स्टोअर, रिलायंस डिजिटल, क्रोमा किवा इतर ब्रँडच्या रिटेल स्टोअरमधून विक्रीसाठी उपलब्ध होते. शिवाय ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन स्मार्टफोन विक्री करत होते. मात्र एवढ्या वर्षानंतर कंपनीने आपले अधिकृत अॅपल स्टोअर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील पहिले अॅपल स्टोअर उघ़डण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी कंपनीने अॅपल सिरीज मुंबई रायझिगमध्ये पहिल्या दिवसापासून ते उन्हाळ्यापर्यंत विषेश टुडेची घोषणा केली आहे. या अंतर्गत मुंबईतील स्थानिक नागरिक, मुंबईच्या संस्कृतीचा उस्तव साजरा होणार आहे. अभ्यागतांना, स्थानिक कलावंत आणि क्रिएटिव्हना एकत्र आणून, अॅपलच्या सर्व उत्पादन आणि सेवेची माहिती देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

सायबर मिडिया रिसर्च नुसार अॅपलचा भारतीय मोबाईल बाजारातील वाटा ४ टक्के एवढा आहे.२०२२ या वर्षात अॅपल स्मार्टफोनच्या आयातीत १७ टक्के वाढ झाली आहे. २०२२ मध्ये ६ अब्ज डॉलर किंमतीचे अॅपल उत्पादनांचा भारतात खप झाला.

SL/KA/SL

11 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *