Stock Market: शेअर बाजार 1000 अंकांनी का घसरला? पाच महत्त्वाचे मुद्दे…

 Stock Market: शेअर बाजार 1000 अंकांनी का घसरला? पाच महत्त्वाचे मुद्दे…

नवी दिल्ली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : BSE बेंचमार्क सेन्सेक्स सलग पाच सत्रांमध्ये 1,045 अंकांनी घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारामुळे भारतीय शेअर बाजारावर वाईट परिणाम झाला आहे. परिणामी निफ्टी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

BSE बेंचमार्क सेन्सेक्स 1,062 अंकांनी घसरून बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 343 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 2.02 टक्क्यांनी घसरून 51,479 अंकांवर बंद झाला. निफ्टी 2.19 टक्क्यांनी घसरून 15,571 अंकांवर आला.

शेअर बाजारात घसरण होण्यास कारणीभूत घटक

फेडने अमेरिकेत व्याजदर वाढवले

अमेरिकेतील महागाई 40 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असून शेअर बाजार कोसळला आहे.

विदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक परत

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्री सुरू ठेवली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत विदेशी गुंतवणूकदारांकडून 31,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांत २.२ लाख कोटी रुपये काढण्यात आले आहेत.

बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात वाढ केली आहे

यूएस फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदर वाढीमुळे बँक ऑफ इंग्लंडवर दबाव आला आहे. परिणामी, चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड आता व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आज 45 सेंटने घसरून 118.06 डॉलरवर आल्या आहेत. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे.

प्रतिकूल जागतिक परिस्थिती

यूएस फेडने व्याजदर वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि वाढती जागतिक महागाई याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर झाला आहे. जर्मन शेअर बाजार DAX दोन टक्क्यांनी घसरला, तर आशियाई शेअर बाजार हाँगकाँग दोन टक्क्यांनी घसरला. चीन, ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील शेअर बाजारातही काहीशी घसरण झाली.

 

HSR/KA/HSR/ 16  June  2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *