भांडवली बाजाराची (Stock Market) विक्रमी घोडदौड सुरूच. निफ्टी १६,५०० व सेन्सेक्स ५५,००० च्या पातळीवर.

 भांडवली बाजाराची (Stock Market) विक्रमी घोडदौड सुरूच. निफ्टी १६,५०० व सेन्सेक्स ५५,००० च्या पातळीवर.

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजाराने नवीन विक्रम प्रस्थापित केला. बाजारावर जागतिक संकेत,’बीएसई’ची स्मालकॅप  समभागांबाबत नवी नियमावली,वीकली एक्सपायरी,किरकोळमहागाईचादर(Retail inflation),औद्योगिक उत्पादन आकडे(IIPData),अमेरिकेतील महागाईचेआकडे(USInflation),यूकेचाजीडीपी(UK GDP),तिमाही निकाल(Quarterly results) या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी. The market set a new record this week. Investors should be cautious.

“The stock market is designed to transfer money from the active to the patient.”  Warren Buffett

बाजारात अस्थिरता असूनही बाजाराचा सकारात्मक बंद. Markets end on positive note amid volatility

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात जोरदार झाली.निफ्टीने १६,३०० चा टप्पा पार केला. खाजगी बँकांच्या समभागात जोश होता. आय.टी क्षेत्रातही तेजीचा माहोल होता, परंतु वरच्या  स्तरावर बाजारावर दबाव निर्माण झाला.बाजरात दिवसभरात बाजारात मोठ्या प्रमाणात  चढ उतार दिसले.परंतु बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी हिरवे निशाण फडकावून बंद झाले..दिवसभरातील कामकाजात M&M, Tech Mahindra, Axis Bank, Bajaj Finserv  आणि IndusInd Bank ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व Tata Consumer Products, Coal India, Adani Ports, SBI Life Insurance आणि Bharti Airtel   ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले.बाजार बंद होताना सेन्सेक्स १२५ अंकांनी वधारून ५४,४०२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २० अंकांनी वधारून १६,२५८ चा बंद दिला. Sensex, Nifty Resume Up move after a Day’s Breather.

दोन दिवसांच्या अस्थिर सत्रानंतर सुद्धा  निफ्टी, सेन्सेक्स उच्च पातळीवर बंद. Nifty, Sensex Close Higher After Another Volatile Session.

मंगळवारी बाजाराची सुरुवात मजबूत झाली. बाजाराने नवीन विक्रमी शिखर  काबीज केले. विक्रमी उच्चांका नंतर, बाजार कामकाजाच्या शेवटच्या  तासात घसरला.दूरसंचार, आयटी आणि बँकिंग समभागांनी बाजाराला आधार दिला.मिडकॅप(Midcap) आणि स्मॉलकॅप(Smallcap) समभागांमध्ये विक्री दिसून आली. रुपयाही आज घसरला. १९  जुलैनंतर रुपयाची सर्वात मोठी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज १६ पैशांनी कमजोर होऊन ७४. ४२ वर  बंद झाला.बाजार बंद होताना सेन्सेक्स १५२ अंकांनी वधारून ५४,५५५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २२ अंकांनी वधारून १६,२८० चा बंद दिला.

बीएसईच्या ऍड ऑनच्या नव्या नियमावलीच्या  घोषणेनंतर बाजारात घसरण शेवटच्या तासात बाजार सुधारलाNifty, Sensex Pare Losses After Sharp Slide.

संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली. जोरदार सुरुवात केल्यानंतर बाजाराला गती कायम राखता आली नाही. ‘बीएसई’वर स्मालकॅप  समभागांबाबत  ऍड ऑनच्या नव्या नियमावलीची घोषणा झाल्यानंतर बुधवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केली.परंतु शेवटच्या तासात बाजार सुधारला.  बीएसईने ‘ऍड-ऑन प्राइस बँड फ्रेमवर्क’ वर स्पष्टीकरण दिले आणि म्हटले की नवीन फ्रेमवर्क ज्या कंपन्यांना लागू होईल  त्यांची बाजारपेठ १,००० कोटी रुपयांपेक्षा कमी आणि X, XT, Z, ZP, ZY, आणि Y गटातील सिक्युरिटीजवर असेल.बाजार बंद होताना सेन्सेक्स २८अंकांनी घसरून ५४,५२५ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने २ अंकांच्या किरकोळ वाढीसह १६,२८२ च्या स्तरावर सपाट बंद दिला. Market ends flat amid volatility.

वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराने नवीन विक्रम प्रस्थापित केला. Nifty hits all-time high,Sensex surges to new record high on F&O expiry day

गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवात मजबुतीने झाली. अमेरिकेतील महागाईचे आकडे कमी झाल्याने व यूकेच्या(UK)जीडीपी(GDP) मध्ये सुधार झाल्याच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांमध्ये जोश पसरला. दिवसभराच्या कामकाजात सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे ५४८७४.१ आणि १६३७५. ५० असे नवीन विक्रमी उच्चांक नोंदवले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३१८ अंकांनी वधारून ५४,८४३  या स्तरावर बंद झाला व निफ्टी ८२ अंकांनी वधारून १६,३६४चा बंद दिला. Markets end near the day’s high level supported by the IT and PSU Banking names.

गुरुवारी बाजाराचे सत्र झाल्यानंतर संध्याकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलै मधील किरकोळ महागाईचा दर ५.५९% व जून मधील देशाचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक १३.६% एवढा जाहीर झाला.Retail inflation eases to 5.59% in July; industrial output grows 13.6% in June.

सलग दुसऱ्या दिवशी निफ्टी व सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद Sensex, Nifty end at record closing high 

आठवडयाचा शेवटच्या दिवशी  भारतीय बाजाराची सुरुवात मजबूत झाली. अनुकूल जागतिक संकेत आणि महागाई व औद्योगिक उत्पादनाचे आश्वासक आकडे याच्या जोरावर भारतीय बाजाराने शुक्रवारी पुन्हा एकदा  नवीन विक्रम प्रस्थापित केला. आय.टी( IT)क्षेत्रातील तेजीने बाजाराला आधार दिला.निफ्टीने प्रथमच १६,५०० व सेन्सेक्सने ५५,००० चा टप्पा केला पार.दिवसभरातील कामकाजात Tata Consumer Products, TCS, L&T, Bharti Airtel आणि HCL Technologies  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व Eicher Motors, Dr Reddy’s Labs, Cipla, Power Grid Corpआणि Britannia Industries  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५९३ अंकांनी वधारून ५५,४३७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १६५ अंकांनी वधारून १६,५२९चा बंद दिला.

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market

jiteshsawant33@gmail.com  

JS/KA/PGB
14 Aug 2021

mmc

Related post