युद्धकाळात मागणे नाही तर देशहित महत्वाचे कामगार नेते एडवोकेट एस. के. शेट्ये

मुंबई, दि 14
देशातील कामगार विरोधी चार लेबर कोड, सामाजिक सुरक्षा कायद्यातील बदल आणि गोदी कामगारांची थकबाकी यासारखे कामगारांच्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना ज्येष्ठ कामगार नेते अॅड. एस. के. शेट्ये यांनी स्पष्ट केले की, स्युद्धप्रसंगी कामगार हितापेक्षा देशहित महत्त्वाचे आहे.र हे ते एक जाहीर सभेत बोलत होते.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनची मॅनेजिंग कमिटीची बैठक नुकतीच माझगाव येथील कामगार सदन सभागृहात पार पडली. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी सांगितले की, रगोदी कामगारांचा वेतन करार होऊन सहा महिने उलटले आहेत आणि कायद्यानुसार कामगारांना तीन महिन्यात थकबाकी देणे
बंधनकारक आहे. तरीही थकबाकी अजून दिली गेलेली नाही.
त्याच वेळी, चार लेबर कोड आणि सामाजिक सुरक्षा कायद्यातील बदल विरोधात केंद्रीय कामगार संघटनांनी २० मे २०२५ रोजी भारत बंद पुकारला आहे. पण, युद्धाच्या प्रसंगी केंद्रीय कामगार संघटनांचा कसा प्रतिसाद असेल हे फार महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या युद्धप्रसंगी गोदी कामगारांनी अत्युत्तम कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीम पटेल, उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे यांनी देखील मार्गदर्शनपर भाषणे केली. या सभेत मोहम्मद हनीफा, अँड संजय सिंघवी, कमिटी मेंबर नारायण हरबा, प्रवीण रॉय यांनी एकत्र येऊन कामगारांच्या कामगिरीला सलाम केला.
तसेच, मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने आयोजित शोकसभेत मोहम्मद हनीफ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी, मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड असोसिएशनचे अध्यक्ष सी. जे. मेडोसा, जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी विद्याधर राणे, दत्ता खेसे, माजी बोर्ड मेंबर कल्पना देसाई आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर ज्ञानेश्वर वाडेकर यांनी देखील शोकसभेत उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. KK.MS