मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची केंद्राकडे शिफारस

 मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची केंद्राकडे शिफारस

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील मध्य , पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही स्थानकांची नावं बदलण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आला.

मध्य रेल्वेवरील करीरोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग रेल्वे स्थानक, सॅण्डहर्स्ट रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी तर पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी आणि चर्नीरोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक त्याचप्रमाणे हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळाचौकी , सॅण्डहर्स्ट रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याची शिफारस या ठरावात करण्यात आली आहे.

ML/ML/SL

9 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *