दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार ८ मे २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत प्रकटन प्रसिद्ध केले असून, पुणे, मुंबई, नागपूरसह नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणांची पडताळणी ९ मे पासून करता येईल.
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
पुढील संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येईल.
https://mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्यांना फेरपरीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठीची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळवली जाईल.
SL/ML/SL