पोह्याचे आप्पे

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:
पोहे 2 वाटी, रवा 2 चमचे, गाजर किसून 1, कोथिंबीर मूठभर, कांदा 1 बारीक चिरून, राई ¼ चमचा, जिरे ¼ चमचा, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता 4-5 पाने, दही 100 ग्रॅम, तेल, मीठ चवीप्रमाणे
क्रमवार पाककृती:
प्रथम पोहे भिजवून ठेवा. पोहे भिजेपर्यंत 2 चमचे तेल गरम करून त्यात राई, जिरे, चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कढीपत्ता परतून घ्या नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका व परतून घ्या. ही फोडणी थंड होऊ द्या. भिजवलेले पोहे थोडे स्मॅश करून घ्या. त्यात किसलेले गाजर, दही, कोथिंबीर, रवा आणि तयार केलेली फोडणी टाका. चवीप्रमाणे मीठ टाका. आवश्यकतेनुसार पाणी टाका. मिश्रण जास्त पातळ करू नका थोडे जाडसर ठेवा. आप्पेपात्रात पाव चमचा तेल टाका तेल थोड गरम झाले की तयार केलेले आप्प्यांच मिश्रण टाका. 2 मिनिटे झाकण ठेवा. 3 ते 4 मिनिटमध्ये 1 बाजूने आप्पे शेकले की चमच्याच्या सहाय्याने ते परतून दुसर्या बाजूने शेकून घ्या. दोन्ही बाजूने आप्पे शेकले की चटणी किंवा सॉस सोबत गरमागरम आप्पे खाण्यासाठी तयार.
poha appe dish
ML/ML/PGB
13 Jun 2024