अहमदाबाद दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला तीव्र शोक

Narendra Modi,
नवी दिल्ली, दि. १२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये आज झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि या घटनेने मोठा धक्का बसला असल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश स्तब्ध आणि दुःखी झाला आहे. ही घटना शब्दात वर्णन करण्यापलीकडे दुःखद आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या दुर्घटना पीडितांना तातडीने आणि परिणामकारक पद्धतीने मदत मिळावी यासाठी आपण संबंधित मंत्री आणि प्रशासनासोबत सातत्याने संपर्कात असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः
“अहमदाबादमधील दुर्घटनेने आम्हाला मोठा धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. ही घटना शब्दात वर्णन करण्यापलीकडे दुःखद आहे. या दुःखद प्रसंगी, माझ्या सहवेदना या दुर्घटनेची झळ बसलेल्या सर्वांसोबत आहेत. ज्यांना याची झळ पोहोचली आहे त्यांना मदत करणारे मंत्री आणि प्रशासनासोबत मी संपर्कात आहे”