अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये एक टक्का आरक्षण

 अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये एक टक्का आरक्षण

मुंबई, दि. 8 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना काळात अनेक मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहे. अशा मुलांना आणि अन्य कारणांमुळे अनाथ झालेल्या राज्यातील अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.One percent reservation for orphans in education and government jobs

१८ वर्ष पूर्ण होण्याआधी दोन्ही पालक गमावलेली मुलं नोकरीसाठी पात्र असतील, असं या आदेशात नमूद केलं आहे.

आई-वडील, भावंड, जवळचे नातेवाईक, गाव, तालुका याविषयी माहिती नसताना अनाथाश्रमात राहणाऱ्या मुलांची ‘अ’ वर्गवारी करण्यात आली आहे. ज्या मुलाने दोन्ही पालक गमावले, ज्याच्याकडे जात प्रमाणपत्र नाही आणि अनाथाश्रमात राहात आहे त्यांचा ‘B’ या वर्गवारीत समावेश करण्यात आला आहे.

ज्या मुलांनी १८ वर्षे पूर्ण होण्याआधी दोन्ही पालक गमावले असतील परंतु नातेवाईकांनी त्यांना वाढवलेले असेल ते ‘C’ श्रेणीत येतील.

अनाथ मुलांना अनुसूचित जातीच्या निकषावर वय, शिकवणी आणि परीक्षा शुल्कामध्ये सवलतीसाठी असतील. पण ‘C’ श्रेणीमधील अनाथ मुलांना शिक्षणात सर्व सवलती मिळतील पण सरकारी नोकऱ्यांसाठी ते पात्र नसतील,असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

अनाथांसाठी नोकऱ्यांमधील आरक्षण एकूण रिक्त पदांच्या संख्येवर आणि प्रवेशासाठी खुल्या जागांच्या संख्येवर आधारित दिलं जाईल.

SL/ KA/ PGB
8 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *