या वाहनांना समृद्धी महामार्गावर २० हजारांचा दंड

 या वाहनांना समृद्धी महामार्गावर २० हजारांचा दंड

मुंबई, दि. 8 ( एमएमसी न्यूज नेटवर्क): समृद्धी महामार्गामुळे वेग वाढल्याने वेळ वाचत असला तरी गेल्या काही दिवसांत अनेकदा अपघात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामार्ग पोलीस वाहनांच्या वेगावर आणि स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विविध उपक्रम करत आहेत. आता या महामार्गावर अती वापर झाल्यामुळे गुळगुळीत गोटा झालेल्या टायर असलेल्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.20,000 fine on Samriddhi Highway for these vehicles

अति वापर झाल्याने घासलेल्या टायरसह समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर आरटीओने (RTO) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आरटीओने तीन वाहनांवर 20 हजार रुपयांचा दंड (RTO Fine) ठोठावला आहे.
‘Tred depth Analyzer’ च्या साह्याने RTO कडून महामार्गार टायरची तपासणी सुरू आहे.

आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या प्राणांतिक अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातांवर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
SL/ KA/ PGB

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *