LIC म्युच्युअल फंडाने सुरु केली 100 रुपयांची SIP

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या गुंतवणूकसाठी SIP हा सर्वांधि ट्रेंडींग पर्याय झाला आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवणूक करण्याचा कल काही काळापासून वाढला आहे. यामुळेच म्युच्युअल फंड वेगवेगळ्या ऑफर्सद्वारे गुंतवणूकदारांना एसआयपी सुरू करण्याची संधी देत आहेत. आता एलआयसी (LIC) म्युच्युअल फंडाने दररोज 100 रुपयांची एसआयपी सुरू केली आहे.
LIC दैनिक SIP हप्त्यांची किमान संख्या 60 आहे. कंपनीने दररोज, मासिक आणि त्रैमासिक आधारावर वेगवेगळ्या कालावधीसाठी किमान एसआयपी रक्कम आणि हप्त्यांची संख्या जाहीर केली आहे. या एसआयपी एलआयसी म्युच्युअल फंड ईएलएसएस टॅक्स सेव्हर आणि एलआयसी म्युच्युअल फंड युलिप वगळता सर्व विद्यमान म्युच्युअल फंड योजनांवर लागू होतील. दैनिक एसआयपी आता 100 रुपये असेल.
ईएलएसएस टॅक्स सेव्हर स्कीम अंतर्गत असलेल्या त्रैमासिक एसआयपीची किमान रक्कम आणि हप्ते देखील 16 ऑक्टोबर 2024 पासून सुधारित करण्यात आले आहेत. आता त्रैमासिक एसआयपीद्वारे किमान 1,000 रुपये आणि त्यानंतर 500 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. हप्त्यांची किमान संख्या सहा आहे.
SL/ML/SL
16 Oct. 2024