केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ

 केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी जामीनावर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील मतदानानंतर २ जूनला पुन्हा तुरुंगात जावे लागले आहे. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने आज (5 मे) अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ केली. केजरीवाल यांना न्यायालयातूनच VC मार्फत हजर करण्यात आले. न्यायालयाने केजरीवाल यांचा वैद्यकीय आधारावर 7 दिवसांचा जामीन मागणारा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. तसेच केजरीवाल यांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

1 मे रोजी झालेल्या सुनावणीत विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला होता. केजरीवाल यांनी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करून घेण्यासाठी 7 दिवसांचा जामीन मागितला होता, परंतु अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात त्यांच्या अपीलला विरोध केला होता. केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने 10 मे रोजी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. 21 दिवस जामिनावर बाहेर राहिल्यानंतर केजरीवाल यांनी 2 जून रोजी सायंकाळी 5 वाजता तिहारमध्ये सरेंडर केले.

त्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी त्यांना 5 जूनपर्यंत ईडी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. एजन्सीने केजरीवाल यांच्या कोठडीसाठी अर्ज दाखल केला होता, परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अंतरिम जामिनावर असल्याने अर्ज प्रलंबित होता.

केजरीवाल यांनी 2 जून रोजी सरेंडर करण्यापूर्वी आप कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहे, असे ते म्हणाले होते. मी परत कधी येईन माहीत नाही. तिथे माझे काय होईल हे मला माहीत नाही. निवडणूक प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने मला 21 दिवसांचा जामीन दिला होता. यासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो. आज मी पुन्हा तिहार तुरुंगात जात आहे. या 21 दिवसांत मी एक मिनिटही वाया घालवला नाही. ते पुढे म्हणाले की, ‘आप’ माझ्यासाठी महत्त्वाची नाही, आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे. मला दिल्लीतील जनतेला सांगायचे आहे की मी घोटाळा केला आहे. हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवल्यामुळे मी पुन्हा तुरुंगात जाणार आहे.

SL/ML/SL

5 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *