World Cup क्रिकेटच्या मैदानात आज भारताची पहिली लढत आयर्लंडशी

 World Cup क्रिकेटच्या मैदानात आज भारताची पहिली लढत आयर्लंडशी

न्यूयॉर्क, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी प्रथमच Cricket World Cup ते सामने अमेरिकेच्या भूमीवर खेळवले जात आहेत. २ जून पासून सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये यावर्षी अमेरिकेचा संघही उतरला आहे. यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेला पहिला सामना जिंकून अमेरिकेने या सामन्याचा शुभारंभ केला. आज भारताचा Cricket World मधील पहिला सामना आयर्लंडशी होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ८ वाजता सुरु झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. पहिल्याच अर्ध्यातासात भारतीय गोलंदाज अर्शदिप सिंग याने दोन विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी आयर्लंडची धावसंख्या ५ ओव्हर्समध्ये २६ अशी होती. हा सुरुवातीचा कल पाहता आजचा पहिला सामना भारत सहज जिंकणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान प्रथमच अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला की, “मी कधीही अमेरिकेत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकेन, असे वाटले नव्हते. आता हे वास्तव बनले असून यावरून जगात क्रिकेट खेळाचे महत्त्व वाढत असल्याचे दिसून येते. अमेरिकेत कदाचित असे बरेच लोक असतील, ज्यांनी हा खेळ स्वीकारला आहे आणि विश्वचषकाचे आयोजन करून जागतिक स्तरावर क्रिकेट स्वीकारणारा हा कदाचित पहिला देश ठरणार आहे.”

टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडिया:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

टी-२० विश्वचषक २०२४ मधील संघांचे गट:
अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

SL/ML/SL

5 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *