TATA च्या ‘या’ कंपनीचे होणार विलीनीकरण

 TATA च्या ‘या’ कंपनीचे होणार विलीनीकरण

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर फायनान्स लिमिटेडचे टाटा कॅपिटल लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. हा करार शेअर स्वॅपद्वारे पूर्ण केला जाणार आहे. टाटा मोटर फायनान्सचे शेअर स्वॅप डील अंतर्गत टाटा कॅपिटलमध्ये विलीन केले जातील, असे टाटा मोटरने जाहीर केले. टाटा मोटर्सने सांगितले की ही योजना सेबी, रिझर्व्ह बँक, एनसीएलटी, टीसीएल आणि टीएमएफएल चे सर्व भागधारक आणि कर्जदार यांच्या मंजुरीच्या अधीन असेल आणि पूर्ण होण्यासाठी नऊ ते 12 महिने लागतील.

टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड ही टाटा मोटर्स लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या फाइलिंगमध्ये म्हटले की, त्यांच्या संचालक मंडळाने टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेडचे टाटा कॅपिटल लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. . हा व्यवहार वाहन कंपनीच्या नॉन-कोअर व्यवसायातून बाहेर पडण्याच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि उत्पादनांवर भांडवली खर्चावर लक्ष केंद्रित करण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

कंपनीने म्हटले आहे की, टाटा मोटर्स लिमिटेड (TML), टाटा कॅपिटल लिमिटेड (TCL) आणि टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड (TMFL) च्या संचालक मंडळाने एनसीएलटी योजनेच्या व्यवस्थेद्वारे टीएमएफएल (TMFL) चे टीसीएल (TCL) मध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. या विलीनीकरणाअंतर्गत टीसीएल, टीएमएफएलच्या भागधारकांना त्याचे इक्विटी शेअर जारी केले जातील परिणामी टाटा मोटर्स विलीन झालेल्या घटकामध्ये 4.7 टक्के भागभांडवल धारण करेल.

SL/ML/SL
5 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *