JNU ने तोडला तुर्कीच्या विद्यापीठासोबतचा करार

नवी दिल्ली, दि. १४ : भारत-पाक संघर्षामध्ये पाकची पाठराखण करणाऱ्या तुर्कीच्या विरोधात देशभर वातावरण तापले आहे. सोशल मिडियावर तुर्कीच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरु आहे. त्यानंतर आता जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाने तुर्कीतील एका विद्यापीठासोबतचा करार मोडीत काढला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (JNU) तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार रद्द केला आहे. जेएनयूने एक्स वर लिहिले – आम्ही देशासोबत उभे आहोत.