भारत सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांमध्ये गणला जाणार

 भारत सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांमध्ये गणला जाणार

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या 2021-22 या आर्थिक वर्षात भारत सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांमध्ये (Economy) गणला जाईल असे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सने (S & P Globle Ratings) म्हटले आहे. पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था (Economy) 10 टक्के दराने वाढेल अशी अपेक्षा आहे. एस अँड पी चे संचालक, सोव्हरेन अँड इंटरनॅशनल पब्लिक फायनान्स रेटिंग्ज अ‍ॅन्ड्र्यू वुड यांनी सांगितले की 2021 मध्ये भारताच्या संदर्भातला अंदाज चांगला आहे. गेल्या वर्षी रखडलेले अनेक आर्थिक उपक्रम पुन्हा रुळावर येण्याची अपेक्षा आहे. यामुळे विकासाबाबतचा अंदाज दृढ झाला आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian Economy) संरचनात्मक सामर्थ्यही दिसून येत आहे.
एका वेबिनार दरम्यान भारतातील परिस्थितीबाबत बोलताना वुड म्हणाले, ‘प्रगती करणार्‍या बाजारपेठेत भारत सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. यावर्षी भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian Economy) वेगाने घसरण झाली आहे. जगातील अनेक देशांच्या तुलनेत ती जास्तच आहे असे म्हणता येईल. परंतु पुढच्या वर्षी 10 टक्के विकास दराचा अंदाज आहे, जो भारताला सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांमध्ये घेऊन येईल. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर पुढील काही वर्षांत सहा टक्के किंवा त्याहून जास्त असण्याचा अंदाज आहे.
पतमानांकन संस्थेने म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian Economy) उत्पादन, सेवा, कामगार बाजार आणि महसूल आकडेवारी प्रत्येक आघाडीवर सुधारणा दर्शवित आहे. वित्तीय तूट या वेळी जास्त खर्चामुळे लक्ष्यापेक्षा अधिक वर जाऊ शकते, परंतु पुढे सरकारने यावर नियंत्रण ठेवण्याचे सांगितले आहे. वुड म्हणाले की जर सुधारण्याची गती अपेक्षेपेक्षा कमी राहिली तर पतमानांकनाच्या आघाडीवर चिंता निर्माण होऊ शकते. तूट आणि सरकारी कर्जाच्या पातळीवर बरेच काही अवलंबून असेल. एस अँड पी ने दोन बँकांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.
 
PL/KA/PL/18 FEB 2021

mmc

Related post