डिजिटल खरेदीच्या जागतिक गुंतवणुकीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

 डिजिटल खरेदीच्या जागतिक गुंतवणुकीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

लंडन, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत (India) हे डिजिटल खरेदी (Digital Shopping) क्षेत्रातील कंपन्यांसाठी जागतिक उद्योग भांडवल गुंतवणुकीचे दुसरे सर्वात मोठे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या एका अधिकृत विश्लेषणात ही माहिती देण्यात आली. विश्लेषणानुसार, 2021 मध्ये भारतात या क्षेत्रात 22 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे, जी 2020 च्या तुलनेत 175 टक्के अधिक आहे. त्यावेळी आठ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती.

जागतिक स्तरावर डिजिटल खरेदी (Digital Shopping) क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक मिळवण्याच्या बाबतीत भारत (India) अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने या क्षेत्रात सर्वाधिक 51 अब्ज डॉलर, चीनने 14 अब्ज डॉलर आणि ब्रिटनने 7 अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळवली.

त्याचवेळी भारतात (India) बेंगळुरू, 2021 मध्ये डिजिटल खरेदी क्षेत्रात 14 अब्ज डॉलरच्या उद्योग भांडवल गुंतवणुकीसह अव्वल स्थानावर आहे. गुरुग्राम 4 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह सातव्या तर मुंबई 3 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह दहाव्या स्थानावर आहे.

डीलरूम डॉट कॉम गुंतवणूक आकडेवारीच्या लंडन अँड पार्टनर्सच्या विश्लेषणानुसार, कोविड-19 साथीमुळे टाळेबंदी दरम्यान जगभरात ऑनलाइन खरेदीच्या वाढत्या मागणीमुळे जागतिक गुंतवणूकदार ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळले आहेत.

India has emerged as the world’s second largest source of global capital investment for digital shopping companies. This was stated in an official analysis released on Wednesday. According to the analysis, India has invested 22 22 billion in this sector in 2021, which is 175 per cent more than in 2020.

PL/KA/PL/10 MAR 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *