गृहनिर्माण वित्तपुरवठा कंपन्यासाठी रिझर्व्ह बँकेची नवी मार्गदर्शक तत्वे

 गृहनिर्माण वित्तपुरवठा कंपन्यासाठी रिझर्व्ह बँकेची नवी मार्गदर्शक तत्वे

दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गृहनिर्माण वित्तपुरवठा कंपन्यांवरील (एचएफसी) (HFC) आपली पकड घट्ट केली आहे. रिझर्व्ह बँकेने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत जी लिक्विडिटी कव्हरेज रेशो (Liquidity coverage ratio) , जोखीम व्यवस्थापन, मालमत्ता वर्गीकरण आणि मूल्य प्रमाणानुसार कर्ज याच्याशी संबंधित आहेत. याशिवाय कोणालाही कसलाही त्रास होऊ नये यापद्धतीने संपूर्ण यंत्रणा चालवण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न आहे. भविष्यातील योजनेनुसार रिझर्व्ह बँकेने काही सल्ले देखील या कंपन्यांना दिले आहेत.

मार्गदर्शक तत्त्वे का जारी करावी लागली

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) म्हणण्यानुसार सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे तात्काळ प्रभावाने पालन करण्यास सांगण्यात आले आहे. ही नवीन मार्गदर्शक तत्वे गृहनिर्माण वित्तपुरवठा कंपन्यांविरोधात अनेक तक्रारी येऊ लागल्याने जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गुंतवणूकदार आणि ठेवीदारांचे नुकसान होईल असे कोणतेही काम एचएफसींनी (HFC) करु नये असे रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे म्हटले आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सूचीबद्ध समभागांची हमी घेऊन कर्ज देणार्‍या एचएफसींना मुल्यप्रमाणा नुसार कर्जाचे प्रमाण 50 टक्के राखावे लागेल. एचएफसीला सोन्याच्या दागिन्यांच्या हमीवरील कर्जासाठी हे प्रमाण 75 टक्के ठेवावे लागेल.

एचएफसी म्हणजे काय?

कोणत्याही बिगर-बँकिंग वित्तीय कंपनीच्या एकूण मालमत्तेचा 60 टक्के हिस्सा गृहनिर्माण क्षेत्राला कर्जासाठी दिला गेला तर त्याला एचएफसी (HFC) म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की एचएफसींना लिक्विडिटी कव्हरेज रेशो संदर्भात एक लिक्विडिटी बफर राखावा लागेल. यामुळे भविष्यात रोख रकमेशी संबंधित कोणत्याही अडचणी असल्यास त्यांना या निधीतून मदत होईल.
सुधारणांसाठी रिझर्व्ह बँकेचे सातत्याने प्रयत्न
रिझर्व्ह बँक (RBI) देशातील बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने पार पडावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. कोरोना काळात आलेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक भविष्यासाठी अशी पावले उचलत आहे जेणेकरून अडचणीच्या काळात निधीची कोणतीही अडचण येऊ नये.
 
PL/KA/PL/19 FEB 2021

mmc

Related post