भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत गोल्डमन सॅक्सने वर्तवला हा अंदाज

 भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत गोल्डमन सॅक्सने वर्तवला हा अंदाज

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वॉल स्ट्रीट ब्रोकरेज गोल्डमन सॅक्सने (Goldman Sachs) वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 9.1 टक्के वर्तवला आहे. 2020 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) 7 टक्क्यांनी मोठी घसरण झाली होती. आता भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात जाहीर केलेल्या आपल्या अहवालात, गोल्डमन सॅक्सने 2021 मध्ये अर्थव्यवस्था 8 टक्के आणि 2022 मध्ये 9.1 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गोल्डमन सॅक्सने (Goldman Sachs) आपल्या अहवालात म्हटले आहे की त्यांना सरकारी भांडवली खर्च सुरु राहण्याची अपेक्षा आहे. खासगी कॉर्पोरेट कॅपेक्स सुधारणेची चिन्हे दिसत आहेत. अहवालात म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2022 मध्ये खप आणि गुंतवणूक ही विकासाचे मुख्य कारणे असतील. अहवालात म्हटले आहे की 2022 मध्ये खपाच्या वाढीसाठी ते महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी अपेक्षा आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, विषाणू संसर्गाच्या स्थितीत झालेली सुधारणा आणि लसीकरणातील भरीव प्रगतीमुळे अर्थव्यवस्था (Indian economy) पूर्णपणे खुली होत आहे.

 

Wall Street brokerage Goldman Sachs has projected India’s GDP growth to be 9.1 per cent in FY2022. In 2020, the Indian economy contracted by 7%. Now, in its report on the Indian economy, Goldman Sachs has projected the economy to grow at 8 per cent in 2021 and 9.1 per cent in 2022.

PL/KA/PL/24 NOV 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *