भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अर्थतज्ञांनी व्यक्त केले हे मत

 भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अर्थतज्ञांनी व्यक्त केले हे मत

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी सांगितले की, कोविड-19 (Covid-19) साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या अडथळ्यातून भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) “बऱ्याच प्रमाणात” सावरली आहे. त्याचबरोबर ही सुधारणा सुरु राहून 7 ते 8 टक्के विकास दर पुन्हा पूर्ववत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पनगढिया यांनी सुचवले की सरकारने आता 2022-23 मध्ये वित्तीय तूट अर्धा ते एक टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याचा आपला हेतू दर्शवावा. अर्थतज्ञ अरविंद पनगढिया यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) कोविड पूर्व जीडीपी स्तरावर परतण्यासाठी चांगली सुधारणा झाली आहे… फक्त खासगी उपभोग अद्यापही कोविड-19 (Covid-19) पूर्व पातळीच्या खाली आहे.”

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर 9.2 टक्के रहाण्याचा अंदाज वर्तवला आहे, त्यावर पनगढिया यांनी सांगितले की ‘हा आकडा इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत जास्त आहे आणि देशभरात पुनरुज्जीवन झाले आहे’. गेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) 7.3 टक्क्यांची घसरण झाली होती.

पनगढिया यांनी सांगितले की, साथ तज्ञांचे असे मत आहे की लसीकरण आणि कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांमुळे, लोकसंख्येच्या मोठ्या हिश्श्यामध्ये अँटीबॉडी आहेत, त्यामुळे साथ अंतिम टप्प्यात असण्याची दाट शक्यता आहे. जर असे खरोखरच झाले तर आशा आहे की सुधारणा सुरू राहील आणि 7 ते 8 टक्के वाढ पुन्हा होईल.

सध्या कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले पनगढिया यांनी सांगितले की, सरकारने आता वित्तीय तूट कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण असे केले नाही तर पुढच्या पिढीसाठी कर्जाचा मोठा बोजा निर्माण होईल.

कोविड-19 (Covid-19) साथीमुळे 2020-21 मध्ये वित्तीय तूट 9.5 टक्क्यांपर्यंत वाढली होती. चालू आर्थिक वर्षात (2021-22) वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) 6.8 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Arvind Pangadhiya, a former vice-chairman of the policy commission, said the Indian economy had recovered “to a large extent” from the outbreak caused by the Covid-19 epidemic. At the same time, he hoped that the reforms would continue and the growth rate of 7 to 8 per cent would be restored.

PL/KA/PL/26 JAN 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *