गोल्डमन सॅक्सने देखील भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला

 गोल्डमन सॅक्सने देखील भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची ब्रोकरेज संस्था गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) कोरोना विषाणू (corona virus) साथीचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे अनेक राज्यात आणि शहरांमध्ये लागू करण्यात आलेली टाळेबंदी (Lockdown) या पार्श्वभुमीवर आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा भारताच्या आर्थिक वाढीचा (economic growth) अंदाज 11.7 टक्क्यांवरून 11.1 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने एक भयानक रूप धारण केले आहे आणि आतापर्यंत 2.22 लाख लोकांचा मृत्यु झाला आहे, तर संसर्गाचे दररोज 3.5 लाख नवे रुग्ण आढळुन येत आहेत.

निर्बंधांचे परिणाम दिसून येत आहेत
The effects of the restrictions are visible

संपूर्ण देशात कडक टाळेबंदी (Lockdown) लागू करण्याची मागणीदेखील जोर धरु लागली आहे, मात्र आर्थिक नुकसानीचा विचार करता मोदी सरकारने आतापर्यंत हे पाऊल उचलण्याचे टाळले आहे. गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs) यांनी एका अहवालात म्हटले आहे की, टाळेबंदीची तीव्रता मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. तरी देखील भारतातील मोठ्या शहरांमध्ये कठोर निर्बंधाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत.

टाळेबंदीचे परिणाम
Consequences of Lockdown

शहरांमधील कडक टाळेबंदीमुळे (Lockdown) विशेषकरुन सेवांवर परिणाम झाला आहे. याशिवाय वीजेचा वापर आणि एप्रिलमध्ये उत्पादन पीएमआय स्थीत राहिल्यामुळे उत्पादन क्षेत्रावरही परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोल्डमॅन सॅक्सने सांगितले की, ‘एकूणच, बहुतेक संकेतांक अजूनही गेल्या वर्षीच्या दुसर्‍या तिमाहीच्या (एप्रिल-जून) तुलनेत या वेळी परिणाम कमी झाला आहे हेच दर्शवत आहेत.
ब्रोकरेज संस्थेने म्हटले आहे की तिसर्‍या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) पुन्हा तेजी येणे अपेक्षित आहे कारण तोपर्यंत निर्बंध काहीसे कमी झालेले असू शकतात. अशा परिस्थितीत, गोल्डमॅन सॅक्सचा (Goldman Sachs) अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान भारताची जीडीपी वाढ (GDP growth) 11.1 टक्के असेल. याआधी ती 11.7 टक्के रहाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

अनेक संस्थांनी अंदाज कमी केला
Many organizations downgraded growth forecast

गोल्डमॅन सॅक्स (Goldman Sachs) ही भारताचा जीडीपीचा (GDP growth) अंदाज कमी करणारी पहिली ब्रोकरेज संस्था नाही. गेल्या महिन्यात, जपानची कंपनी नोमुराने (Nomura) आर्थिक वर्ष 2022 मधील भारताच्या जीडीपीतील वाढीचा अंदाज 13.5 टक्क्यांवरून कमी करुन 12.6 टक्के केला होता. जेपी मॉर्गन (JP Morgan) यांनीही तो 13 टक्क्यांवरून कमी करुन 11 टक्के केला आहे. त्याचप्रमाणे यूबीएसने (UBS) भारताच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज 11.5 टक्क्यांवरून कमी करुन 10 टक्क्यांवर आणि सिटीने (Citi) देखील तो कमी करुन 12 टक्के केला आहे.
 
Goldman Sachs, a US-based brokerage firm, has downgraded India’s economic growth forecast for FY 2021-22 from 11.7 per cent to 11.1 per cent in the wake of the outbreak of the corona virus and the consequent Lockdown in several states and cities. The second wave of corona virus infection in India has taken a terrible turn and so far 2.22 lakh people have died, while 3.5 lakh new cases of the infection are being detected every day.
 
PL/KA/PL/5 MAY 2021
 

mmc

Related post