मोफत लस आणि अन्नधान्यासाठी सरकारचे 80 हजार कोटी रुपये खर्च होणार

 मोफत लस आणि अन्नधान्यासाठी सरकारचे 80 हजार कोटी रुपये खर्च होणार

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लस (Free Vaccine) आणि दिवाळीपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य (Free Ration) देण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही योजनांवर सरकारला 80 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य देण्यासाठी सरकारला 70 हजार कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर मोफत लसीकरणासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना या घोषणा केल्या. पंतप्रधान म्हणाले होते की लसीकरणाला वेग देण्यासाठी 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लस दिली जाईल.

रोखे बाजारातून निधी उभा करण्याची गरज नाही
There is no need to raise funds from the bond market

मोफत लस (Free Vaccine) आणि अन्नधान्यासाठी (Free Ration) सरकारला रोखे बाजारातून (Bond market) निधी उभारण्याची गरज भासणार नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून (RBI) सरकारला 99,120 कोटी रुपयांचा लाभांश प्राप्त झाला आहे. याशिवाय मालमत्तांच्या विक्रीतूनही निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
या अतिरिक्त पैशातून सरकार अन्नधान्य वितरणावर एकूण 1.35 लाख कोटी रुपये खर्च करू शकेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. अर्थसंकल्पात लसीकरणासाठी सरकारने 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र वित्त मंत्रालयाच्या प्रवक्त्याने यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता
Likely to disturb financial calculations

एम के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या अर्थशास्त्रज्ञ माधवी अरोरा यांचे म्हणणे आहे की रिझर्व्ह बँकेकडून (RBI) मिळालेला लाभांश आणि चांगली वाढ यामुळे कर महसूल जास्त असायला हवा. परंतु आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.
याचे कारण अन्न व खतांवरील अनुदानासह ग्रामीण रोजगार-हमी कार्यक्रमावर सरकारला जास्त पैसे खर्च करायचे आहेत. याव्यतिरिक्त, मालमत्ता निर्गुंतवणूक (Asset Disinvestment) कार्यक्रमातून अपेक्षेपेक्षा कमी निधी जमा होण्याचा धोका देखील आहे.
The central government has announced free vaccinations for all people above 18 years of age and free ration for 80 crore people till Diwali. The government will have to spend Rs 80,000 crore on both these schemes. Sources say the government will have to spend an additional Rs 70,000 crore to provide free ration by November.
PL/KA/PL/9 JUNE 2021
 

mmc

Related post