भाविकांच्या बसला अपघात , १३ जखमी

 भाविकांच्या बसला अपघात , १३ जखमी

नाशिक, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): त्र्यंबकेश्वर येथे आज दुपारच्या सुमारास देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस उलटल्याने १३ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.Devotees bus accident, 13 injured

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जखमी बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस उलटल्याचे बोलले जात असून बसमध्ये एकूण २९ प्रवासी होते. त्यापैकी १३ जण जखमी आहेत. तसेच भाविकांनी भरलेली ही बस नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडाला अडकल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

ML/KA/PGB
9 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *